जो जास्त विरोध करेल त्यालाच.., निधी वाटपावर जयंत पाटलांची टीका
Mansoon Session : विरोधकांना जो जास्त विरोध करेल त्यालाच जास्त निधी देण्याचं काम राज्य सरकारकडून असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली आहे. नूकताच उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद केली. यामध्ये सर्वच पक्षांच्या आमदारांनी निधी देण्यात आला असून विशेष म्हणजे शिंदे गटाच आमदार भरत गोगावलेंना 150 कोटींची निधी देण्यात आला आहे. त्यावर जयंत पाटलांनी गोगावलेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.
शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा शहरी भागातला मतदारसंघ असल्याने थोडफार मागेपुढे झालं असावं, असं ते म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वच आमदारांना भरघोस निधी दिला आहे, पण शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघासाठी अद्याप निधी दिला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यावर पुढे बोलताना पाटील म्हणाले, सत्तेत नवीन लोकं आल्यानंतर आता समित्या, महामंडळ नेमले जातील. त्यानंतर सर्वांना खुश ठेवण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचंही ते म्हणाले आहे. मात्र, विरोधकांना जो कडाडून विरोध करतो त्यालाच अधिक प्रमाणात निधी मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भाष्य करीत टीका केली. सध्या शिंदेंचीच काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहित असून त्यांनाच सामावून घेणं मुश्किल झाल्याचं ते म्हणालेत. शरद पवारांची जी भूमिका तीच आमची भूमिका असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.