Download App

Maratha Andolan : लाठीचार्ज का केला? उत्तर द्या; मुनगंटीवारांना युवकांनी विचारला जाब

Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे तीव्र पडसाद (Maratha Andolan) शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेचा निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. सत्ताधाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचा फटका आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. हिंगोलीच्या औंढा शहरात भाजप पदाधिकाऱ्याच्या निमित्ताने मुनगंटीवार येथे आले होते. यावेळी तरुणांनी त्यांनी घेराव घालत लाठीमाराच्या घटनेचा जाब विचारला.

Maratha reservation agitation : सरकार एक पाऊल मागे; जालन्यातील ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ पुढे ढकलला

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मराठा (Maratha Andolan) तरुणांची भेट घेतली. लाठीमाराच्या घटनेनंत हिंगोलीच्या औंढा शहरात भाजप पदाधिकारी बैठकीनिमित्त मुनगंटीवार तेथे आले होते. यावेळी तरुणांनी त्यांना घेराव घातला. गोळीबार आणि लाठीचार्ज का केला, असा सवाल केला. मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतीत (Maratha Andolan) तत्काळ भूमिका जाहीर करावी अशी मागणी या तरुणांनी केली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यानंतर मुनगंटीवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

जालन्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम लांबणीवर

दरम्यान, 8 सप्टेंबरला जालन्यात ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ होणार होता मात्र आता मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Andolan) चिघळल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान या अगोदर देखील हा जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ दोनदा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलन चिघळल्यामुळे तिसऱ्यांदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

‘इंडिया’ बैठकीवरील लक्ष हटविण्यासाठी लाठीमार; राऊतांचा गंभीर आरोप

काय आहे प्रकरण ?

सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी (Maratha Andolan) मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंबड व गेवराई तालुक्याती 123 गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी राज्य सरकारने ठोस आश्वासन दिले नव्हते. या कारणामुळे जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी आंदोलनस्थळी झाली होती. त्यानंतर मात्र येथे लाठीमाराची घटना घडली. पोलिसांच्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले.

Tags

follow us