Download App

Maratha Reservation याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या मैदानात; ‘मराठा मावळे म्हणाले तर…’ पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : राज्यात सध्या एकीकडे मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation ) वातावरण तापलेलं आहे. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच मराठा समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करणारे याचिकाकर्ते विनोद पाटील ( Vinod Patil ) यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू होणार; CM शिंदेंची घोषणा

आग्रा या ठिकाणी शिवजयंती साजरी केल्याबद्दल विनोद पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमामध्ये आपण लोकांच्या आग्रहाखातर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा विनोद पाटील यांनी केली. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये विनोद पाटील कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबद्दल चर्चांना उधान आलं आहे.

Raashii Khanna: ‘योद्धा’ सिनेमाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला इंडस्ट्रीत…’

पुढे बोलताना विनोद पाटील म्हणाले की, येणारी लोकसभा निवडणूक मी छत्रपती संभाजीनगरमधून लढणार आहे. मात्र मी निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार आहे? हे अद्याप ठरलेले नाही. कारण अजून मला कोणत्याही पक्षाने निवडणूक लढवण्याबद्दल विचारलेलं नाही. त्यामुळे जो पक्ष योग्य वाटेल, सर्वजण जो पक्ष सांगतील त्या पक्षाकडून मी निवडणूक लढवेल. कारण सर्व पक्ष योग्य असून कोणत्याही पक्षाची लायकी काढण्याची माझी योग्यता नाही. त्याचबरोबर माझ्या मराठा मावळ्यांनी जर मला अपक्ष लढायचं सांगितलं. तर मराठा समाजाचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी मी अपक्ष देखील लढेल. अशी प्रतिक्रिया यावेळी विनोद पाटील यांनी दिली.

दरम्यान सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज एकवटलेला आहे. त्याचा फायदा पाटील यांना नक्की होऊ शकतो. तसेच एकीकडे येत्या 10 ते 15 दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून संभाजीनगरमध्ये कोणता उमेदवार असणार याची घोषणा झालेली नाही. त्यात आता पाटील यांनी निवडणुक लढवण्यासाठी सर्वच पक्ष योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विनोद पाटील युतीकडे जाणार की, आघाडीकडे या चर्चांना उधाण आले आहे.

follow us

वेब स्टोरीज