Raashii Khanna: ‘योद्धा’ सिनेमाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला इंडस्ट्रीत…’

Raashii Khanna: ‘योद्धा’ सिनेमाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला इंडस्ट्रीत…’

Raashii Khanna Film Yodha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) आणि राशि खन्ना (Rashi Khann) सध्या त्यांच्या आगामी ‘योद्धा’ सिनेमामुळे (Yodha Movie) जोरदार चर्चेत आले आहे. आगामी ॲक्शनर ‘योद्धा’मध्ये नंतर चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी राशी खन्ना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पॅन इंडिया स्टार राशी खन्ना हिने सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिला नवीन कलाकारासारखे का वाटले? याबद्दल खुलासा केला आहे.

हिंदी चित्रपटासाठी तिला इतका वेळ का लागला ? याबद्दल बोलताना तिने सांगितले की तिला अर्थपूर्ण स्क्रिप्ट हवी होती. अष्टपैलू पॉवरहाऊस असलेली राशी म्हणते ” जर स्क्रिप्ट अर्थपूर्ण असेल तरच मला काम करावं असे वाटत. मला व्यक्तिरेखा आवडतात. त्यात येण्यासाठी माझ्यासाठी हे एक चांगलं पॅकेज असायला हवं आणि हा चित्रपट तसाच होता. मला तो चित्रपट पैसा वसुल करणार आहे असं वाटतं. राशी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून या चित्रपटात “थ्रिलिंग एलिमेंट्स”, आणि “रोमान्स” आहे आणि “सीट थ्रिलरची” एक मज्जा सुद्धा आहे असं तिला वाटतं.

‘योद्धा’मध्ये राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहेत दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, ‘योधा’ 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Akshay Kumar भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार? सर्वत्र चर्चांना उधाण

राशी खन्नाच्या योद्धा सिनेमा सुरूवातीला 11 नोव्हेंबर 2022 दिवशी रिलीज होणार होता, मात्र निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जुलै 2023, 15 सप्टेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 आणि नंतर 8 डिसेंबर 2023 केली होती. आता हा सिनेमा 15 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा नुकतचं विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टीसोबत ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube