Download App

जाळपोळ हा पूर्वनियोजित कट, आंदोलनकर्ते कुठून आले? पोलीस अधिक्षकांचे थेट उत्तर

  • Written By: Last Updated:

Beed SP Police on Violence: मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मागणीसाठी मराठवाड्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) बीड शहराचे शरद पवार गटाचे आमदार संदिप क्षीरसागर (Sandip Shirsagar) यांचे घरे जाळण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हे नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. क्षीरसागर यांचे घरावर जमाव गेला होता. हिंसाचार केल्याप्रकरणी शंभराहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोनशेहून अधिक जणांचे चौकशी करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (Nandkumar Thakur) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. एकाचवेळी अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आहे. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट वाटत असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

Ketaki Chitale: ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, आरक्षणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

30 ऑक्टोबरला जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे संचारबंदी हटवून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाची तुकडी, बाहेरील जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

Bhide Wada महिनाभरात रिकामा करा, अन्यथा…; SC ने भाडेकरूंचे अपील फेटाळले

आमदारांची घरे जाळण्याच्या घटनेवर पोलीस अधीक्षक ठाकूर म्हणाले, दोन्ही ठिकाणी जाळपोळीच्या घटनेतील मॉब हिंसक होता. दोन्ही घरांमध्ये महिला, लहान मुले होते. त्यावेळी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी लहान मुलांचे हॉस्पिटल असताना शेजारी आग लावण्यात आली. माजलगाव नगरपालिकेला आग लावली तेव्हा महिला कर्मचारी अडकून पडले होते. जाळपोळ करणे हा मॉबचा उद्देश होता. त्यामुळे यामागे वेगळाच इरादा होता हे दिसून येत आहे. त्यानुसार तपास करण्यात येत आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे शंभर जणांना अटक
बीड शहरात झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यातून शंभर जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 44 जणांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहेत. हिंसेतील दोनशे जणांची नावे उघडकीस आले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

काही जण राजकीय पक्षासाठी निगडीत
हिंसा प्रकरणात अटक केलेले आरोपी तरुण आहेत. त्यातील 17 ते 22 वर्षांतील वयोगटातील अनेक आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिल्यानंतर काही लोक फार आक्रमक होते. त्यातील काही फरार आहेत. त्यातील काही जणांचा शोध सुरू आहे. काही जण राजकीय पक्षाशी निगडीत आहेत. बीड शहरातील आजू-बाजूच्या खेड्यातील तरुण असल्याचे माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

Tags

follow us