Download App

मुंबईला जाणारचं! सगेसोयरे, कुणबी प्रमाणपत्राच्या मागण्यांवर मनोज जरांगे ठाम

Image Credit: Letsupp

Manoj Jarange : मराठा समाजाच्या (Maratha Reservation)ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुनबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी गेल्या दोन महिन्यांपासून आपण करत आहोत. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांना कुनबी प्रमाणपत्राचा लाभ द्या, त्याचबरोबर कुटुंबाचे सगेसोयरे यांना कुनबी प्रमाणपत्राचा फायदा देण्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarangeठाम आहेत. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मोदींना वय विचारा! म्हणणाऱ्या नानांवर दादा चिडलेच; ‘नाक खुपसू नका, आम्ही आमचं बघू’

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईला (Mumbai)जाण्यावर ठाम असल्याचे स्वतः जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आरक्षण मिळालं तरी जायचं आणि नाही मिळालं तरी जायचं असा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं आणि नाही मिळालं तर ते आणण्यासाठी जायचं, असं जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख, आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाही’; अजितदादांचा संताप

सरकारकडून सगेसोयरे शब्दाचा गोंधळ निर्माण केला जात आहे. सगेसोयरे शब्दाची व्याख्या आपल्याकडून स्पष्ट केली असतानाही सरकार मात्र त्याबद्दल गोंधळ निर्माण करत आहे. आणि त्यामुळे आपण मराठा समाजासाठी मरेपर्यंत हटणार नाही.

मराठा समाजाला पक्क आरक्षण दिल्याशिवाय आपण हटणार नसल्याचं यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपण मराठा आरक्षणासाठी मुंबईला येणार म्हणजे येणारचं, असं म्हणत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणावर तोडगा निघाला अशा बातम्या माध्यमांवर दाखवल्या जात आहेत. मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मराठा समाजानं कोणावरही विश्वास ठेऊ नये.

आपण ज्यावेळी मुंबईमधील आंदोलनाची घोषणा केली होती, तेव्हा गिरीश महाजन यांनी आपल्याला सांगितलं होतं की, 20 जानेवारीला मुंबईत येण्याची गरज पडणार नाही, त्याच्या आधीच मराठा आरक्षण दिलं जाईल. पण आता दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे कुठं आहे आरक्षण असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

follow us

वेब स्टोरीज