Download App

‘आमच्या गाड्या रोखाल तर तुमचं दूध, भाजीपाला बंद करू’, जरागेंचा राज्य सरकारला इशारा

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : सरकारला अल्टिमेटम देऊनही राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. जरागेंच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सहा जिल्ह्यातून जाणार आहे. दरम्यान, जरांगे यांनी आज अंतरवलीत पत्रकार परिषद घेऊन या पदयात्रा व उपोषणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला उपोषण आणि पदयात्रेत अडथळा आणू नका. आमच्या गाड्या रोखाला तर मुंबईकडे जाणारे, दूध, भाज्या, अन्नधान्य थांबवण्यात येईल, असा इशारा दिला.

बावनकुळेंनी रणशिंग फुंकलं! महायुतीचा पहिला उमेदवार घोषित; कोण आहे उमेदवार? 

आंदोलनाच्या तयारीसाठी अंतरवली सराटीत आज पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांनीशी संवाद साधताना जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. जरांगे यांना विचारले की, सरकार तुमच्या पदयात्रेत अडथळा आणेल असे का वाटते? त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार नाही. या पदयात्रेत कोणतेही अडथळे येणार नाहीत. पण, यापूर्वी आम्हाला काही वाईट अनुभव आले आहेत. त्यामुळं मुंबईकडे कुच करणाऱ्या मराठ्यांना घेरण्याचं मनसुबे रचले रचले जात आहेत. पण यावेळी आम्ही आधीच तयारी केली आहे. त्यामुळे अंतरवालीसारखा प्रयोग पुन्हा करण्याची स्वप्ने सरकारने पाहू नये. असे केल्यास हे सरकारला जड जाईल, असं जरांगे म्हणाले.

‘आव्हाड हे बेदखल नेते, त्यांचा ‘तो’ दावा निलाखस खोटा; सुनील तटकरेंचा पलटवार 

सरकारने आगीशी खेळ करू नये
ते म्हणाले, सरकारने आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, आमच्या गाड्या रोखल्या, त्यासाठी डिझेल दिलं नाही किंवा जेवणााठी गॅस दिला नाही, तर आम्ही काय करायचे? आमच्याकडे कोणता पर्याय आहे? आम्ही डिझेलशिवाय गाडी चालवण्याची तयारी केली आहे. आम्ही असे नमुने आहोत की, त्यांनी आम्हाला गॅस दिला नाही तर आम्ही त्याचीही तयारी केली आहे. आम्ही स्वयंपाक बनवण्यासाठी लाकडं घेणार आहोत. पण, सरकारने आगीशी खेळ करू नये. आम्हाला त्रास दिला तर तुमचं दूध बंद होणार हे नक्की, असा इशाराही जरांगेंनी दिला.

आम्हीही तुम्हाला त्रास देऊ
तुम्ही आम्हाला रोखालंत तर आम्ही मुंबईची नाकेबंदी करू, आमचा मराठा शेतकरी तुम्हाला दूध देणार नाहीत. बाजरी, गहू, सोयाबीन, डाळी तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही आम्हाला त्रास द्याल, तर आम्हीही तुम्हाला त्रास देऊ, असंही जरांगे म्हणाले.

मुंबईत आरक्षण मागण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवाच्या खाण्यापिण्याची सोय करण्याची जबाबदारी मुंबईकर मराठ्यांवर टाकण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.

सरकार आमच्याशी गनिमी कावा करतेय
जरांगे म्हणाले की, आंतरवली ते मुंबई हा पायी प्रवास किती टप्पे असेल, दररोज किती प्रवास करावा लागेल, आम्ही कुठे मुक्काम करणार आहोत, याची सर्व माहिती 10 जानेवारीला दिली जाईल. सरकार आमच्याशी गनिमी कावा करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

follow us