Download App

Maratha Reservation : अध्यादेश निघाला पण बीडमध्ये आरक्षणाची धग कायम; एसटी बसच जाळली

Maratha Reservation : एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नावर समिती गठीत करुन अध्यादेशही काढला तरीही बीडमध्ये आंदोलनाची धग अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील गेवराईमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटी बस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनाने आंदोलन सुरु आहे.

पुण्याला राज ठाकरेंनी गंभीरतेने घेतलयं…. भाजपची कोंडी करण्यासाठी थेट पुत्रालाच पाठवलयं…

बीडमधील गेवराई भागात मध्यरात्रीच्या सुमारास एसटी जाळण्यात आली असून पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात सकल मराठा समाजाकडून उपोषण सुरुच आहे, तर पिट्टी नायगावमध्येही आज सलग पाचव्या दिवशीही आंदोलकांकडून उपोषण सुरुच आहे. धारुरमधील कारी गावातही तरुणांकडून साखळी उपोषण सुरु असून अनेक गावांमध्ये सत्ताधारी सरकारचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा काढण्यात येत आहे.

Asia Cup 2023 : पाकिस्तानचा आणखी एक विजय; सुपर 4 मध्ये बांग्लादेशवर मात

जालन्यात नेमकं काय घडलं?
आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत असून आंदोलन सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला.

‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र

आंदोलनस्थळी बाचाबाची सुरु असतानाच अचानकपणे जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं.त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, बीडमधील अनेक प्रमुख रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरु असून तालुक्यांच्या ठिकाणांसह बाजारपेठांमध्ये वाहतुक कोंडी झाली आहे, तर सरकारचा निषेध मराठा तरुणांकडून मुंडन करुन केलं जात असल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे.

Tags

follow us