Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखील अडवले जात आहेत. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी नामी शक्कल लढवली आहे.
सावंतांनी नामी शक्कल लढवली…
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आज तुळजापूरला गेले होते. त्यावेळी त्यांचं हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर लॅंड होणार होते. तेथे मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यामुळे या आंदोलकांना टाळण्यासाठी तानाजी सावंतांनी नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी थेट दुसरं हेलिपॅड बनवत त्यावर त्यांचं हेलिकॉप्टर लॅंड करण्यात आलं. त्यानंतर ते तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात पोहचले.
Shyamchi Aai Trailer: ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची तुफान पसंती
मंत्री तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा जिल्ह्यात नियोजित दौरा होता. त्यामध्ये मात्र मराठा राठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे तानाजी सावंतांना देखील या विरोधाला सामोर जावं लागलं. मात्र त्यावर त्यांनी नामी शक्कल लढवली.
ठिकठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखल अडवले जात आहेत. यामध्ये शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या ताफ्याला घेराव घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. राजळे यांना खरवंडी कासार येथे घेराव घालत मराठा आरक्षणा संदर्भात त्यांची भुमिका जाणून घेतली.