मराठवाडा पदवीधर निवडणूक; तीन टर्म आमदार सतीश चव्हाणांची वाट भाजप अडविणार ?

Marathwada Graduate Constituency election: 18 वर्षांपासून पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सतीश चव्हाण यांच्या रुपयाने पकड आहे.

Satish Chavan

Satish Chavan

Marathwada Graduate Constituency election : औरंगाबाद विभाग म्हणजेच मराठवाडा पदवीधरसाठी निवडणूक जाहीर झालीय. या जागेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असलेले सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी सलग तीन विजय मिळत हॅट्रिक केलीय. ते 2008 पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत. आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सतीष चव्हाण हे रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केलीय. पण भाजप चव्हाणांना जागा सोडणार का ? महाविकास आघाडीची रणनिती काय असणार हे जाणून घेऊया…

भाजप जागा घेणार का ?
18 वर्षांपासून पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सतीश चव्हाण यांच्या रुपयाने पकड आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघावर हवी तशी पकड नसल्याचे बोलले आहे. या मतदारसंघात पूर्वी भाजपचे उमेदवार निवडून येत होते. 2008 पूर्वी भाजपचा उमेदवार या मतदारसंघावर निवडून यायचा. जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी असे या मतदारसंघाचे भाजप आमदार राहिलेले आहेत. सतीश चव्हाण हे सलग तीनदा निवडून आलेले आहेत. चौथ्यांदाही तेच निवडणूक लढविणार आहेत, असे सतिश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहेत. भाजप ही जागा राष्ट्रवादीला सोडू इच्छित नाही.


निवडणूक आयोग अन् एसआयआरविरूद्ध ठाकरे बंधूंचा एल्गार! 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा

भाजप नेते व सतीश चव्हाणांमध्ये संघर्ष
सतीश चव्हाण आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष आहे. सतीश चव्हाण हे विधानपरिषदेचे आमदार असताना ते विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गंगापूर विधानसभा मतदारसंघात प्रशांत बंब यांच्याविरोधात रिंगणात उतरले होते. परंतु पराभूत झाले होते. त्यानंतर ते लगेच पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. आता तेच राष्ट्रवादीकडून उमेदवार असू शकतात. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांना कडाडून विरोध सुरू झालय. भाजप नेते संजय केणेकर यांनी तर थेट विरोध दर्शविला आहे. पदवीधर मतदारसंघ भाजपकडेच राहिला पाहिजे. ही प्रत्येक कार्यकर्त्याची ठाम भूमिका आहे. यासाठी पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीय, असा दावा संजय केणेकर यांनी केला. केणेकर हे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी भाजपमध्ये रस्सीखेच आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले होते. पण पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी तिन्ही पक्षांची महायुती न झाल्यास स्बळावर लढलास मात्र राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमध्येच फाइट होऊ शकते.

विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातून व्हिडीओ व्हायरल; प्रकृतीबाबत चाहत्यांना चिंता

विविध पक्षांकडून चाचपणी सुरू
मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. दोन्ही शिवसेना व काँग्रेसकडूनही उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडी झाली नाही तर स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यताही पक्षांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version