निवडणूक आयोग अन् एसआयआरविरूद्ध ठाकरे बंधूंचा एल्गार! 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा

Raj Thackeray and Udhhav Thackeray against Election Commission विरूद्ध मुंबईमध्ये जनमोर्चाचे आयोजन केले आहे.

Raj Thackeray And Udhhav Thackeray Against Election Commission

Raj Thackeray and Udhhav Thackeray against Election Commission and SIR Public rally in Mumbai on October four : एसआयआर, मतदान यंत्रे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणे इत्यादी मुद्यांवरून गेल्या काही वर्षांपासून भारत निवडणूक आयोग वादात अडकला आहे. आता तर भारत निवडणूक आयोगात (ECI) फूट पडलीय. आपला विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याची तक्रारच तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील दोन सदस्यांनी केलीय. यावरून विरोधकांनी आता थेट निवडणूक आयुक्तांना घेरलं असून एसआयआरविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात आता राज आणि उद्धव ठाकरे यांनी या विरूद्ध जनमोर्चाचे आयोजन केले आहे.

एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला गोल्ड मेडल, फायनलमध्ये 37-34 ने इराणचा पराभव

एसआयआर, मतदान यंत्रे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय यामुळे अगोदरच निवडणूक आयोगावर आरोप केले जात होते. त्यात आता इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानंतर आयोगातील इतर दोन आयुक्तांच्या भूमिकेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तसेच विरोधकांच्या आरोपांना एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे. या सर्वाविरोधात आता एकत्र येत आंदोलन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये जनमोर्चाचे आयोजन केले आहे. 4 ऑक्टोबर 2026 ला असंणार आहे. याबाबत राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुकवरून पोस्ट केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे.

या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत. अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या ! असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

follow us