March to Mumbai for maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी उद्यापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईला (Mumbai) प्रस्थान करणार आहे. जरांगे यांचे गाव अंतरवली सराटी येथून आंदोलक निघणार आहे. त्यापूर्वी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत जात आहे. आरक्षण मिळल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी जाहीर केला आहे.
जरांगे म्हणाले, आता मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचे आहे. हीच योग्य वेळ आहे, मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची. मराठ्यांची शक्ती, ताकद, महाराष्ट्राला, देशाला दाखवून द्यायची आहे. आता मराठे एकत्र आले आहेत. मुंबईतील गल्ला-गल्ल्यांमध्ये २६ जानेवारीला मराठा समाजाची ताकद एकजूट दिसली पाहिजे. आपली ताकद बघून सरकारने दुसरे दिवशी आरक्षण दिले पाहिजे. मराठा आंदोलन व आरक्षणाचा हा शेवटचा टप्पा आहे. घरा-घरांमधून ताकदीने बाहेर एकत्र या, मुंबईला एकजुटीचे धडक द्यायची आहे. पूर्ण जगात इतक्या ताकदीने कोणताच समाज आला नसेल हे दाखवून द्यायचे आहे. किमान दहा वर्ष तरी मराठा समाजाची ताकद, एकदा दाखवायची आहे. कसे आरक्षण मिळत नाही ते दाखवितो, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
ED Notice : रोहित पवारांचा ईडीला आग्रह, दोन दिवस आधीच येतो
कुणाशी वाद घालू नका ?
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला काही आवाहने केली आहे. आपल्या सगळ्यांना मुंबईकडे जावून आरक्षण मिळवायचे आहे. त्यामुळे कुणाशी वाद घ्यालायचे नाही. कुठला जातीशी वाद घालायचा नाही. कोणी काही म्हणत असेल तर तिकडे लक्ष द्यायचे नाही. कुणीच गैरसमज करू घ्यायचा नाही. मी जिवंत असेपर्यंत दगाफटका करणार नाही. आरक्षण मिळण्याशिवाय माघार नाहीच, आरक्षण मिळवायचे आहे. गैरसमज पसरवत असतात. गैरसमज करून घ्यायचे आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय माघार नाही, असे जरांगे म्हणाले.
पुणे लोकसभा : फडणविसांनी कोणाकोणाला शब्द दिलेत….
आम्ही मुंबईची खिंड लढतोय; तुम्ही मागची बाजू लढवा
काही समाजबांधव मागे राहणार आहे. आम्ही मुंबईची खिंड लढवत आहे. मागची बाजू तुम्ही लढवा. ताकदीने शांततेत आंदोलन करायचे आहे. आरक्षणासाठी जीव देण्याची गरज नाही. पण एकजूट फुटू देऊ नका, असे जरांगे म्हणाले.