Uddhav Thackeray on Santosh Bangar : दादागिरी सहन करणार नाही इथपर्यत ठीक आहे पण आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणार असेल तर त्याचा उद्धटपणा चिरडून तुम्हाला टाकावा लागेल. हे सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर हिंगोलीच्या सभेतून केला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगरसह बीआरएसवर जोरदार हल्लाबोल केला.
ते पुढं म्हणाले की अंबादास दानवेंनी त्यांचे धंदे सर्व तुमच्यासमोर मांडले आहेत. असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का? असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्यााला हिंदुत्व म्हणायचं का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरेंची नगर जिल्ह्यात ताकद वाढणार…; साजन पाचपुते ‘शिवबंधन’ बांधणार
काहीजण बाहेरच्या राज्यातून येत आहेत. जणू इकडे शेतकऱ्यांना वालीच नाही. त्यांची भाषा आपली भाषा यात फरक आणि अब आयेगी किसान सरकार. माझ्या समोर शेतकरी बसला आहे आणि मी मुख्यमंत्री असताना जे काही केलं होतं तर तुमच्यापर्यंत पोहचले होते की नाही? जर या गद्दारांनी घात केला नसता तर शेतकऱ्यांच भलं केल असत की नाही? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Eknath Shinde : तिघांचे वाद लवकरच बाहेर येणार; नाथाभाऊंचा दाव्याने खळबळ!
हे जे उपरे येत आहेत त्यांना सांगा आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही. हे जर भाजपची सुपारी वाजवायला येणार असतील आणि भाजप विरोधातील मत फोडणार असाल तर त्यांना सांगतो पहिले तुमचे घर सांभाळा. कारण तुमच्या घराच्या बुडाला सुरुंग लागला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी बीआरएसवर केली.