Eknath Shinde : तिघांचे वाद लवकरच बाहेर येणार; नाथाभाऊंचा दाव्याने खळबळ!

Eknath Shinde : तिघांचे वाद लवकरच बाहेर येणार; नाथाभाऊंचा दाव्याने खळबळ!

Eknath Khadse : राज्याच्या राजकारणात रोजच अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. राज्यातील तीन पक्षांचे सरकार भक्कम असल्याचे सत्ताधारी संधी मिळेल तिथे सांगत आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या सरकारबाबत मोठा दावा केला आहे.

खडसे (Eknath Khadse) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपने राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यातील 45 जागा निवडून येतील, असा त्यांचा दावा आहे. संपूर्ण विधानसभा क्षेत्रात त्यांची चाचपणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भावी मुख्यमंत्री असतील असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगत आहेत.

Devendra Fadnavis : ‘हम तीन साथ तो बनेगी ही’; परभणीत फडणवीसांची सहमती एक्सप्रेस जोरात

जर भाजपला (BJP) मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचे नाव पुढे करायचे असेल तर आज त्यांच्याबरोबर असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे काय?, असा सवाल खडसे (Eknath Khadse) यांनी उपस्थित केला. शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. पण, जर निवडणुकीत असे दावे-प्रतिदावे केला जात असतील तर तिघांचं कसं जमणार? असा सवाल उपस्थित करत ज्यावेळी प्रत्यक्षात निवडणुकांसाठी जागांचे वाटप सुरू होईल त्यावेळी या तिघांतील भानगडी बाहेर येतील असा दावा खडसे यांनी केला.

कांद्यावरील निर्यात शुल्कावरूनही खडसे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने गोंधळीची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. आता कुठे चार पैसे शेतकऱ्यांना मिळायला लागले तर सरकारने लगेच निर्यात शुल्क लावले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला स्थिर भाव मिळावा यासाठी सरकारने तत्काळ आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत असे खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले.

इचलकरंजीकरांनी ‘सुळकूड’चा हट्ट सोडावा अन्यथा रक्तपात होईल’ : मंत्री मुश्रीफांचा टोकाचा इशारा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube