Aurangabad East Maharashtra Assembly Election Result 2024 : मराठवाड्यातील 46 मतदारसंघातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. यात महायुतीची सरशी होताना दिसत असून 46 पैकी 35 च्या पुढे जागा महायुतीकडे सरकताना दिसतात. तर महाविकास आघाडीला साधारण सहा ते आठ जागा मिळू शकतात असे चित्र दिसत आहे. दरम्यान,
मतदार संघात काटे की टक्कर सुरू असल्याचा दिसून येत आहे. भाजपकडून उभारलेले अतुल सावे सध्या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचे मोठे आव्हान आहे.
अतुल सावे चौथ्या क्रमांकावर
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे . भाजपकडून उभे असलेले अतुल सावे सध्या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर इम्तियाज जलील यांचे मोठे आव्हान आहे तर काँग्रेसकडून लहू शेवाळेही रिंगणात आहेत . औरंगाबाद पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील यांना मानणारा मोठा वर्ग आहे . त्यामुळे अतुल सावे यांच्यासमोर जलील यांचे आव्हान आहे . अतुल सावे सध्या चौथ्या क्रमांकावर असून इम्तियाज जलील आघाडीवर असल्याचं दिसतंय . भाजपाच्या अतुल सावेंना फक्त 216 मतं मिळाल्याचं चित्र आहे.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काय स्थिती?
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात २०१९ च्या विधानसभेत भाजपच्या अतूल सावे यांनी एमआयएमच्या डॉ कादरी गफार यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे २०१९ मध्ये विजयी झाले होते. यावेळीही भाजपकडून अतुल सावेंना उमेदवारी आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर MIM कडून इम्तियाज जलील पूर्व विधानसभा मतदारसंघातून यंदा निवडणुकीत उभारले आहेत. तर काँग्रेसकडून लहु शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Maharashtra Election Result : पुण्यात ‘तुतारी’चा आवाज बसला; दिग्गजांची पिछाडी कायम