Dhananjay Munde : देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तर भक्ताच्या मनातला देव निघत नाही, या शब्दांत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान सभेतून शरद पवारांनी धनंजय मुडेंवर टीका केली होती. या टीकेनंतर धनंजय मुंडेंनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Chandrashekhar Bawankule : ‘महायुतीला विधानसभेत 200+ अन् लोकसभेत 45+ जागा मिळणार’
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, देशात लोकशाही आहे. लोकशाहीने सर्वांनाच आपली मते मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेसंदर्भात मला काही बोलायचं नाही. शरद पवारांनी फोटो न वापरण्याच्या केलेल्या सूचना दिल्या आहेत पण देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तर भक्ताच्या मनातला देव निघत नसल्याचं मुंडे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवार पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. फुटीनंतर त्यांनी पहिल्यांदा नाशिकच्या येवल्यातून मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि काल बीडमध्ये पहिलीच स्वाभिमान घेतली. या सभेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या स्वागतासाठी बॅनर लावले होते. या बॅनरवर शरद पवारांचे फोटो होते. या बॅनरवरुन शरद पवारांसह नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आत्महत्या आज होत नसून अनेक दिवसांपासून होतात. खुल्या आभाळाखाली व्यवसाय करणारी शेतकऱ्यांची जात आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करून शाश्वत शेतीचा आधार देण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचं मुंडेंनी आश्वासन दिलं आहे.