Download App

खुलताबादचं नामांतर! …तर आम्ही स्वागतच करु; अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, असं आमदार अबु आझमींनी स्पष्ट केलंय.

Abu Azami : राज्यात मागील अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा चांगलाच तापलेला असतानाच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आणलायं. खुलताबादच रत्नापूर असं नामांतर करण्यात यावं, अशी मागणी शिरसाट यांनी केली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलीयं. नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, आम्ही स्वागत करू असं आझमी म्हणाले आहेत.

“सुटका तर नाहीच पण, त्यांना माफीही नाही”, मंगेशकर रुग्णालय प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

पुढे बोलताना आझमी म्हणाले, जुन्या शहराचे नाव बदलून काय होणार आहे. एखादे नवे शहर वसवले असते तर वेगळा मुद्दा होता. माझे म्हणणे आहे की, जर नाव बदलल्यामुळे महागाई संपुष्टात येणार असेल, नाव बदलल्यामुळे बेरोजगारी संपणार असेल, नाव बदलल्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्था सुरळीत होणार असेल, तर मी तर म्हणेन की, एका ठिकाणाचे नाव नाही, तर संपूर्ण देशाचे नाव बदला, आम्ही स्वागत करू. नावे बदलण्याचा मुद्दा काढून देशातील मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचे काम सुरू असल्याचं आझमी म्हणाले आहेत.

मोठी बातमी, ग्रामपंचायत, पंचात समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

तसेच देशात महागाई वाढली आहे. इतिहास दाखवला पाहिजे मात्र तो बनावट नसावा. शेजारील देश चीनकडून भाराताच्या भूमीवर कब्जा केला जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून रत्नापूर हे नाव इंग्रज काळापासून रेकॉर्डवर आहे. त्यामुळे खुलताबादचं नामांतर रत्नापूर करण्यात यावे, अशी मागणी शिरसाट यांनी केलीयं.

follow us