Imtiyaz Jaleel On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation)मिळविण्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळूपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची कठोर भूमिका घेतली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाचे चर्चा निष्फळ ठरली आहे.आता आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी राजकारणांची चढाओढ लागली आहे. संभाजीनगरचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel )यांनीही दोन दिवसांपूर्वी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर इम्तियाज जलील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चार वर्षांपूर्वी जलील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध दर्शविला आहे. आता मात्र त्यांनी थेट पाठिंबा दिला आहे.
लाच घेतल्याप्रकरणी ‘गेल’च्या संचालकांना सीबीआयकडून अटक
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. 2019 मध्ये विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले होते.त्यावेळी जलील यांना याला विरोध दर्शविला होता. मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मराठा समाजाबरोबरच मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांची होती.
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव, ‘तो’ अधिकार लोकसभा अध्यक्षांना नाही
त्यानंतर चार वर्षानंतर मात्र इम्तियाज जलील यांनी मात्र आपली भूमिका बदलली आहे. मराठा समाजाला आरक्षण का दिले जात नाही. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज यावर इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. तसेच त्यांनी काल जालन्याीतल आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांचीही भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली आहे.
तसेच एमआयएमचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. लाखो संख्येने मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी मान्य करू न्याय का देत नाही, असा सवाल इम्तियाज जलील यांनी सरकारला केला आहे.इम्तियाज जलील यांचा आधीचा आरक्षण विरोधी बोलण्याचे व्हिडिओ व आताचा पाठिंब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.