Sharad Pawar : ‘जालन्यात लाठीहल्ला करण्याची गरजचं नव्हती’
Sharad Pawar : जालन्यात उपोषण करणाऱ्या शेतकरी, महिला, लहान मुलांवर हल्ला करण्यात आला, हा हल्ला करण्याची गरजच नव्हती, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. जळगावात आज राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलत होते.
फडणवीसांकडून मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
शरद पवार म्हणाले, मराठा आरक्षणासाठी जालन्यात शेतकरी बांधव, महिला, लहान मुलं उपोषणाला बसले होते, मात्र, काही एक कारण नसताना सत्तेचा गैरवापर करुन सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे, लाठीचार्ज करण्याची गरजच नव्हती, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Dono Trailer : राजवीर-पालोमाची लव्ह स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘दोनों’चा ट्रेलर प्रदर्शित
जालन्यातील मराठा आंदोलकांवर जो लाठीहल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये शेतकरी, मजूर, महिला, लहान मुल गंभीरपणे जखमी झाले आहेत, आमच्या आया बहीणी, मजूरांवर हल्ला करण्याची ज्यांची निती, त्यांच्या हाती आम्ही सत्ता ठेवणार नसल्याचा इशाराच शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.
सरकारकडून आदेश आला, हे सिद्ध करुन दाखवा; अजितदादांचं विरोधकांना चॅलेंज
दरम्यान, शेतकऱ्यांवर, महिलांवर पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आहे, यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता लाठीहल्ला करणाऱ्यांचा आपण येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के पराभव करणार असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.
सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही :
राज्यात आजची परिस्थिती अवघड आहे. शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल सत्ताधाऱ्यांना चिंता नाही, राज्या पाऊस नाही, धऱणात पाणी नाही, जनावरांनाही पाणी नाही त्याची चिंता सरकारला नाही, शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट असून देशाची सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती गेली असून ही स्थिती बदलायची असल्याचंही ते म्हणाले आहेत.
खानदेशचा इतिहास अभिानास्पद :
काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातच झालं होतं. जळगावात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरुदेखील या अधिवेशनासाठी जळगावात आले होते. त्यामुळे खानदेशचा इतिहास अभिमानास्पद असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.