फडणवीसांकडून मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

फडणवीसांकडून मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

Eknath khadse On Devendra Fadnavis : जळगावमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत महाराष्ट्राला दिलेला एकही शब्द पाळला नाही. तोच मराठा आरक्षणाचा शब्द देऊन मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनीच मराठा आरक्षण घालवलं! बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

यावेळी खडसे यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांचे काही व्हायरल झालेले व्हिडीओ दाखवण्यात आले. त्या व्हिडीओमध्ये फडणवीस यांनी अजितदादा आणि राष्ट्रवादीबरोबर कधीही जाणार नाही असं म्हटलं. त्याचबरोबर ओबीसींना चार महिन्यात आरक्षण दिलं नाही तर राजकारण सोडून देईल असं म्हटलं, त्यावर एकनाथ खडसे यांनी फडणवीसांनी राजकारण सोडलं का असा खोचक सवाल केला.

Rohini Khadase : मणिपूर घटनेवर संसदेत भाजपच्या महिला नेत्या गप्प का? रोहिणी खडसे संतापल्या

एकनाथ खडसे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला अनेक आश्वासनं दिली, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं आश्वासन दिलं होतं पण लग्न केलं. प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहिली. त्यांनी शब्द दिलेलं एकही काम फडणवीसांनी केलं नाही.

आज तोच शब्द देऊन मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम आज सुरु असल्याचा आरोप राज्य सरकारवर आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

मराठा समाज ओबीसीत आरक्षण मागत आहे. वर्षानुवर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. एका बाजूला मराठा आरक्षणाचा विषय मान्य करायचा आणि दुसरीकडे आरक्षणाचा विषय राज्यावर ढकलायचं काम सुरु असल्याची टीका आमदार एकनाथ खडसे यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube