Download App

खासदार ओमराजे निंबाळकरांचे अधिकाऱ्यांना खडेबोल, म्हणाले…

सोलापुर जिल्हा परिषदेत शिक्षकांची पदोन्नती होते, तर धाराशिव जिल्हा परिषद पाकिस्तानात आहे काय? असा सवाल उपस्थित करीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. दीड वर्षांपासून शिक्षकांची पदोन्नती प्रलंबित असल्याने आज अखेर खासदार निंबाळकरांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, आज प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नी खासदार निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली.

Coromandel Express Accident: ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात, 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू , जखमींची संख्या मोठी

दरम्यान, दीड वर्षांपासून धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पदोन्नती न मिळाल्याने शिक्षकांच्यावतीने पदोन्नतीची मागणी करण्यात येत होती. मात्र, जिल्हा परिषदेकडून कुठल्याही हालचाली सुरु नव्हत्या. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

राष्ट्रवादीकडून जिल्हा विभाजनाला धार! जगताप म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाचा…

धाराशिव जिल्ह्यालगत असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेत अनेक शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. मात्र, अद्याप धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांनी जिल्हा परिषदेत मागणी लावून धरली होती. मात्र, जिल्हा परिषदेकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

Wrestlers Protest: ब्रिजभूषण विरुद्ध दोन एफआयआर, विनयभंगासह 10 गुन्हे, जाणून घ्या या कलमांमध्ये किती शिक्षा

त्यानंतर अखेर आज ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह आंदोलक शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून शिक्षकांना पदोन्नती मिळालेली नाही.

राष्ट्रवादीतूनचं शड्डू पडल्यानंतर कोल्हेंच्या लांडेंना शुभेच्छा; म्हणाले, शर्यत अजून….

येत्या 10 जूनपर्यंत हा पदोन्नतीचा विषय मार्गी लागला नाही तर आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिला आहे. यावेळी जिल्हा परिषेदचे शिक्षण विभागातील अधिकारी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, शिक्षक महासंघाचे बाळकृष्ण तांबारे, संतोष देशपांडे, प्रदीप मेत्रे, बिबीशन पाटील, विक्रम पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

Tags

follow us