Download App

नांदेडात शिंदे पॅटर्न! काँग्रेसला धक्का देत बड्या नेत्यासह कार्यकर्ते शिंदे गटात

Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच जोरदार धक्का बसला आहे. नांदेड काँग्रसचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही (Congress) फाटाफूट सुरू झाल्याचे दिसू लागले आहे.

मागील काही दिवसांपासून शिंदे गटात (Eknath Shinde) इनकमिंग वाढली आहे. विशेशतः उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोजच धक्के बसत होते. आता हा पॅटर्न महाविकास आघाडीतील एकमेव अभेद्य असलेल्या काँग्रेसमध्येही सुरू झाला आहे. काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटाची वाट धरत आहेत.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी आरक्षण का दिले नाही? बच्चू कडूंचा हल्लाबोल

नांदेड शहराध्यक्ष मंगेश कदम आणि त्यांची पत्नी ज्योती कदम, अॅड.धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे आदींसह शेकडो कार्यकर्ते बुधवारी शिंदे गटात (Eknath Shinde) दाखल झाले. या पक्ष प्रवेशाने नांदेड शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. मंगेश कदम हे नांदेड जिल्हा परिषदेचे सहा वेळा नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी ज्योती कदम या स्थायी समितीच्या माजी सदस्य होत्या.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन आम्ही कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केल्याचे मंगेश कदम म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने फक्त वापर करून घेतला आणि नंतर आमच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्याचे  मंगेश कदम म्हणाले.

‘रोजगार पळवतायं अन् म्हणतायं शासन आपल्या दारी’; विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका

follow us