मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी आरक्षण का दिले नाही? बच्चू कडूंचा हल्लाबोल

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी आरक्षण का दिले नाही? बच्चू कडूंचा हल्लाबोल

Maratha Reservation : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबबादारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे दोन वर्ष मुख्यमंत्री होते मग तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल केला आहे.

दिव्यांग कल्याण विभागाच्या कार्यक्रमानिमित्त आमदार बच्चू कडू आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की आता पोलिसांनी लाठचार्ज केला म्हणता, मग तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा का आरक्षण दिले नाही?

गुलाबराव पाटलांना ‘जुलाबराव’ म्हणताच चिडले; मराठा आंदोलकाला केली शिवीगाळ?

तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेस सांगत होतात की प्रकरण कोर्टामध्ये आहे. 2014 मध्ये अध्यादेश आणला व 2018 मध्ये कायदा केला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील केला आणि कायदा रद्द झाला ही एक प्रोसिजर आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे. निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले देणार आहेत. या पुढे त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र भेटेल पण त्याला वेळ लागेल, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

‘मी गुवाहाटीला गेलो, बदनाम झालो, त्या बदल्यात ‘हे’ मिळालं’; बच्चू कडू पहिल्यांदा बोलले….

दरम्यान, जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे संपूर्ण राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा संघटनांकडून केली जात आहे. तसेच मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. या हल्ल्याची जबाबदारी घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube