‘मी गुवाहाटीला गेलो, बदनाम झालो, त्या बदल्यात ‘हे’ मिळालं’; बच्चू कडू पहिल्यांदा बोलले….

  • Written By: Published:
‘मी गुवाहाटीला गेलो, बदनाम झालो, त्या बदल्यात ‘हे’ मिळालं’; बच्चू कडू पहिल्यांदा बोलले….

Bachchu Kadu : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करून नवं सरकार स्थापन केलं. तत्पूर्वी हे बंडखोर आमदार गोवा, सुरत, गुवाहाटी असे फिरले. या बंडखोर आमदारांमध्ये आमदार बच्चू कडूही सामील होते. राज्यात परत आल्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर बंडखोर आमदारांना ठाकरे गटाकडून गद्दार गद्दार, खोके सरकार अशी टीका होत राहिली. दरम्यान, आता आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी बदनाम झालो, खरं पण त्या बदल्यात दिव्यांग मंत्रालय मिळालं, असं सांगितलं.

आज धुळे येथील एका कार्यक्रमात बोलतांना आमदार बच्चू कडू बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, दिव्यांग व्यक्तींसाठी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी मी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे करत आहे. मी आधीच्या सरकारमध्ये होतो. तेव्हा राज्यमंत्री असताना आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत होत्या. मात्र, दिव्यांग मंत्रालयाची मागणी पूर्ण होत नव्हती. ही मागणी मान्य करायला कोणी तयार नव्हतं. ही मागणी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मी त्यांना म्हणालो, दिव्यांग मंत्रालय बनवा, हा बच्चू कडू तुमचा गुलाम बनून राहिल. परंतु, तेव्हा ती मान्य झाली नसल्यानं दिव्यांग मंत्रालय झालं नाही.

2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं… 

आमदार बच्चू कडू म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत हा प्रश्न मी सर्वत्र मांडला आहे. मी दिव्यांगासाठी भांडलो आहे. आज सोन्याचे दिवस येत आहेत. आपलं दिव्यांग मंत्रालय हे देशातलं पहिलं मंत्रालय असणार आहे. सर्व आमदार गुवाहाटीला गेले त्या काळात मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा फोन आला. मी त्याला म्हणालो, मी येतोय तुझ्यासोबत. पण तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तर मी तुमच्याबरोबर येईल. त्या काळात मी बदनाम झालो. परंतु, त्याबदल्यात आपल्याला काय मिळालं? दिव्यांग मंत्रालय मिळणार आहे. सामान्य माणसांचं मंत्रालय पहिल्यांदा होतंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube