2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं…

2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं…

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात तिरंगा झेंडा फडकवत नसल्याची टीका अनेकदा विरोधकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच एका कार्यक्रमात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एका तरुणाने 1950 ते 2002 पर्यंत आरएसएसच्या कार्यालयात तिरंगा का फडकवला नाही? असा थेट सवाल केल्यानंतर मोहन भागवत यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका करीत प्रत्युत्तर दिलं आहे.

अजितदादांनी वाद टाळला? पुण्यात न येता मंत्रालयात बैठक; सुनिल टिंगरेंना सोबत घेत अधिकाऱ्यांना निर्देश

मोहन भागवत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन्ही मुख्यालयांमध्ये तिरंगा झेंडा फडकवला जातो, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला आम्ही कुठेही असो, तिरंगा ध्वज फडकवत असतो, याऊलट काँग्रेसचा झेंडा आणि तिरंगा झेंड्याचे रंग सारखेच आहेत, 1933 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात लावलेला झेंडा फडकत नव्हता. तेव्हा एक तरुण समोर आला व रुळावर चढून त्याने दोरीने ओढत तो फडकवला होता.

Eknath Shinde : शिंदेंचंही भारत माता की जय! इंडिया वादात भाजपला मिळालं बळ

त्यावर पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्याची पाठ थोपटून पुढच्या अधिवेशनात सत्कार करण्याचे कबूल केले. मात्र, तो संघाच्या शाखेत जातो हे कळल्यावर त्यांनी तेही केले नाही. शेवटी डॉ. हेडगेवार त्यांना भेटले व तांब्याचा शिक्का देऊन सन्मान केला. सात वर्षांआधी त्या तरुणाचे निधन झाले. त्यामुळे तिरंग्याच्या सन्मानाचा प्रश्न जेव्हाही येतो तेव्हा संघाचा प्रत्येक स्वयंसेवक पुढे असतो, असं प्रत्युत्तर भागवत यांनी दिलं आहे.

आपल्याकडे आरक्षण दिले जाते ते सामाजिक विषमतेचा इतिहास राहिला आहे. 2 हजार वर्षे हे सगळं चाललं. जातीपातीचा उल्लेख रामायणात आहे, तेव्हा सुरू झाले. कालांतराने दूर करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत, ते आरक्षण भेदभाव असेपर्यंतच राहिले पाहिजे, या सगळयांना बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आज जातीभेद दिसत नाही पण आजही अदृश्य जातीभेद सुरू आहे, हे सामाजिक वास्तव दूर झाले पाहिजे, जे उपाय केले ते दूर होण्यासाठी लवकरात लवकर झाले पाहिजे, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube