Eknath Shinde : शिंदेंचंही भारत माता की जय! इंडिया वादात भाजपला मिळालं बळ

Eknath Shinde : शिंदेंचंही भारत माता की जय! इंडिया वादात भाजपला मिळालं बळ

Eknath Shinde : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात आली आहे तर सत्ताधारी पक्षांकडून जोरदार समर्थन केले जात आहे.

Jalna Maratha Protest : हा लेकराबाळांचा प्रश्न, आमची फसवणूक करु नका; मनोज जरांगेंचा इशारा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही भारत (Bharat) माता की जय म्हणत या घडामोडींचे स्वागत केले आहे. शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की केंद्र सरकारने G20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे. देशाच्या राज्यघटनेतच India that is Bharat असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भारत (Bharat) माता की जय हीच घोषणा प्रत्येक देशवासियाच्या मुखातून ऐकू येत होती. साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.. असेच आपल्या कवितेद्वारके देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला भारत या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. भारत माता की जय!

India VS Bharat : नरेंद्र मोदींच्या ओळखपत्रावर आले ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube