सोडून गेलेल्यांचे बीडमध्ये डिपॉझिट जप्त होणार : बड्या नेत्याचा मुंडेंसह बंडखोर आमदारांना इशारा

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. “बीडच्या जनतेचा आशीर्वाद शरद पवारांच्या निष्ठावंतांसोबत असून आगामी निवडणुकीत शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदारांचे डिपॉझिट […]

Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde And Sharad Pawar

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. “बीडच्या जनतेचा आशीर्वाद शरद पवारांच्या निष्ठावंतांसोबत असून आगामी निवडणुकीत शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे”, असा इशारा राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला. (NCP Chief Sharad Pawar rally in Beed in Dhananjay Munde Constituency)

बीडची जनता पवारांना सोडून गेलेल्यांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त करणार :

पवारांच्या या सभेमुळे पक्षाला सोडून गेलेल्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणले असून या सर्व नेत्यांच्या मनात आगामी निवडणुकीत स्वतःचे डिपॉझिट जप्त होण्याची भीती पसरु लागली आहे. तसंच त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते देखील उद्या पवारांच्या सभेला हजेरी लावणार आहेत, असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शरद पवार साहेबांच्या सोबत निष्ठावंतांची फौज उभी राहिलेली आहे व त्याला राज्यातल्या तरुणाईची भरघोस साथ मिळत आहे असेही ते म्हणाले.

पार्थ पवार बोहल्यावर चढणार? काका-पुतण्याच्या भेटीमागे ‘लगीनघाई’

बीड जिल्हा हा राजकीयरीत्या अतिशय संवेदनशील जिल्हा आहे व सदैव जिल्ह्याने शरद पवार यांच्या विचारांना साथ दिली आहे. इथे त्यांना मानणारा मतदारांचा फार मोठा वर्ग आहे आणि ही जनता आज त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे. त्यामुळे बीडच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सबंध राज्यभर प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या निष्ठावंतांना भेटून भाजप विरोधी राष्ट्रवादीची भूमिका जनतेत मांडणार आहेत, असेही तपासे यांनी सांगितेल.

बीड शरद पवारांचा बालेकिल्ला :

बीड जिल्हा हा सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत चालणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अगदी समाजवादी काँग्रेसच्या काळातही जिल्ह्यातील सातही आमदार विजयी झाले होते. पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही जिल्हा पवारांसोबत होता. अनेक मातब्बर घराणी राष्ट्रवादीसोबत आली. यातून विमल मुंदडा, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर अशी मंडळी आमदार झाले. आताही जिल्ह्यातील 6 पैकी 4 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यातील हक्काचा बालेकिल्ला म्हणून बीडकडे पाहिले जाते.

शरद पवार अन् अजितदादांच्या बैठकीत काय घडलं? सुप्रिया सुळेंच्या उत्तरानेही संभ्रम कायम

कोण कोणासोबत?

आता जिल्ह्यातील चार पैकी धनंजय मुंडे, प्रकाश सोळंखे आणि बाळासाहेब आजबे हे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. तर माजी आमदार अमरसिंह पंडित आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण हेही अजित पवार यांच्याबाजूने गेले आहेत. दुसऱ्या बाजूला आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. तर माजी आमदार उषा दराडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेही शरद पवार यांच्याच बाजूने उभारले आहेत.

Exit mobile version