Download App

मुंबईतून आदेश आल्यानंतरच बळाचा वापर; पवारांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

Maratha Aandolan Jalna : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षाणासाठी बसलेल्यांवर मुंबईतून आदेश आल्यानंतरच बळाचा वापर करण्यात आल्याचे थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. घडलेली घटना ही अत्यंत गंभीर असून, यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तोडगा काढावा असे पवारांनी म्हटले आहे. तसेच शांतपणे आंदोलन चालू ठेवण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत आहेत.

जालन्यात आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करताना लहान मुलं, स्त्रिया, वडीलधारे यांच्या वयाचा मान न राखता बळाचा वापर करण्यात आल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारनं आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुर्देवाने तो निर्णय कोर्टात टिकाला नाही.

Thane Crime : पत्नीची गोळी झाडून हत्या, त्याचवेळी पतीचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू

शरद पवार म्हणाले की जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. याची दखल आणि संकटात असलेल्या लोकांना दिलासा दिला नाहीतर हे प्रकार जालना जिल्ह्यापुरता सीमीत राहणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता आहे.

लाठीचार्ज केल्यानं विरोधकांची गृहमंत्र्यांवर टीका, बावनकुळे म्हणतात, ‘फडणवीस हे मराठा समाजाच्या….’

शरद पवार यांनी सांगितले की आज आम्ही अंबडच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली. जखमी लोकांची भेट घेतली. आश्चर्य वाटेल असा बाळाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये लहान मुले, महिला, वडिलधारी मंडळी यांच्यावर पाहिजे तसा बाळाचा वापर केला आहे. जखमी झालेल्या लोकांनी सांगितले की आमची चर्चा चालू होती, अधिकारी आमच्याशी बोलत होते, चर्चेतून काही मार्ग निघेल अशी स्थिती होती पण अचानक पोलीस फोर्स तिथे बोलवण्यात आला. चर्चा चालू असताना मुंबईवरुन सुचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला. पोलीसांनी बळाचा वापर करुन लाठी हल्ला केला असं जखमी झालेल्या लोकांनी सांगितले, असे शरद पवार यांनी सांगितले.

Silvina Luna Passed Away: प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

पोलिसांनी लाठी हल्ला सुरु केल्यानंतर गावातील लोक तिथं जमा झाले. त्यानंतर पोलीसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबारात छोट्या छऱ्यांचा वापर करण्यात आला. काही जखमी लोकांच्या हातावरील आणि पाठीवरचे छरे ऑपरेशन करुन काढले आहेत, अशी माहिती देण्यात आली. निष्पाप लोकांना कशी वागणूक दिली हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला अनुभव आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us