लाठीचार्ज केल्यानं विरोधकांची गृहमंत्र्यांवर टीका, बावनकुळे म्हणतात, ‘फडणवीस हे मराठा समाजाच्या….’

  • Written By: Published:
लाठीचार्ज केल्यानं विरोधकांची गृहमंत्र्यांवर टीका, बावनकुळे म्हणतात, ‘फडणवीस हे मराठा समाजाच्या….’

Jalna Maratha Aandolan : मराठा आरक्षणासाठी जालना (Jalna Maratha Aandolan) जिल्ह्यातील अंतरवली येथं सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. अनेक ठिकाणी निषेध नोंदवल्या जातो. सरकारच्या निषेधात संतप्त मराठा समाजाने अनेक ठिकाणी बसही जाळल्या. दरम्यान, आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं विरोधी पक्षही सरकारवर टीका करत आहे. गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी फडणवीस हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते असल्याचं सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=wMp83yjJFdk

आज माध्यमांशी बोलतांना बावनुकळे म्हणाले की, मराठी समाजाला आरक्षण आणि सवलती देण्यासाठी मराठी समाजाने 2014 ते 2019 याकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना लाखोंच्या संख्येत 60 मूक मोर्चे काढले. एक मराठा, लाख मराठा हे वादळ रस्त्यावर उतरलं होतं. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं नाही. अत्यंत संयमाने मराठा समाजाने आंदोलन मोर्चे काढल्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या जगाला मराठा समाजाने आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यावेळी झालेल्या मागणी नंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

ते म्हणाले, फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. सुप्रीम कोर्टात देखील आरक्षण टिकलं. मात्र, मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकार दरम्यान सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली गेली नसल्यामुळेच मराठा आरक्षण थांबलं असल्याची टीका भाजप बावनकुळे यांनी केली आहे.

परवाचं जे आंदोलन झाले, त्याची चौकशी केली पाहिजे. कारण, मराठा समाज हिंसक आंदोलन करू शकत नाही. ज्यांची चुक असेल त्यांना सरकारने कडक शिक्षा करावी, असं बावनकुळे म्हणाले.

मराठा समाजाला मीच आरक्षण देतो, असं म्हणणाऱ्या फडणवीसांनी आरक्षण दिलेच नाही, तर उलट लाठीचार्च केला. त्यामुळं
फडणवीसांचा राजीनामा मागण्याच्या होत आहे, यावर बोलतांना ते म्हणाले की, मराठा समजाला फडणवीसांनी अनेक सवलती लागू केल्या. मराठा समाजाला ज्या काही आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सवलती मिळाल्या, त्यात फडणवीसांचा मोठा वाटा आहे. सवलती बरोबरच आरक्षणही दिलं. मात्र, दुर्देवानं ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. फडणवीस हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube