Download App

‘2024 ला सरकारलाच गायब करु’; रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर नॉनस्टॉप बरसले

2024 साली निवडणुकीत सरकारलाच गायब करु, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर नॉनस्टॉप बरसल्याचं पाहायला मिळालयं. छत्रपती संभाजीनगरमधील बदनापूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांमध्ये हात घालत सरकारवर टीका केली आहे.

‘नवीन मित्र आल्यानं ताकत वाढते’; अजितदादा-शरद पवारांच्या भेटीवर नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान

रोहित पवार म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडवण्यास कोणालाच नाहीये अन् चाळीस आमदारांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री कोण होणार? याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यातील 10 आमदारांना संधी मिळाली बाकीच्यांना नाही मिळाली. तसेच काहींचं वजन वाढलं तर जे काही पोट शिवलं होतं. काहींचा तर विश्वासच उडालाय, जे पोट शिवत होते त्यांनी घरी जाऊन जाळले सुद्धा कारण गेल्या महिन्याच्या 2 तारखेला दुसराही मित्र पक्ष आल्याने त्यांचा आता विषयच संपला असल्याची टीका पवार यांनी केली आहे.

“ठाकरेंसोबत झाले ते माझ्यासोबतही होऊ शकते” : आयोगाच्या निर्णयावर पवारांनी व्यक्त केली भीती

आधी हे भांडायचे पण आता भांडायलाच कुणी राहिलं नाही. मुख्यमंत्री नाराज, उपमुख्यमंत्री नाराज, आमदार नाराज पण जनतेच्या नाराजीबद्ल कोण बोलणार नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही धराधरी करुन 2024 साली या सरकारलाच गायब करणार असल्याचा विश्वास रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.

डीपीडीसी बैठकीत शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आलं होतं. त्यावरुनही रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टक्केवारी, निधी, उद्घाटनावरुन धराधरी झाली असल्याचा आरोप केला आहे. तसेच जनतेच्या प्रश्नासाठी कोणीही धराधरी करणार नसल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us