डॉ. मंदार उमेश दाभाडे आत्महत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर; काय घडलं?

एका महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याची माहिती समोर आली आहे.

Ambajogaii

डॉ. मंदार उमेश दाभाडे आत्महत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर; काय घडलं?

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई (Ambajogai) येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात 29 वर्षीय डॉक्टर मंदार उमेश दाभाडे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. दाभाडेंनी चनई रोड भागातील संत रोहिदास नगर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या घरात गळफास घेतल्याची घटना ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास समोर आली होती. महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

एका महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मंदार यांनी जीव देण्यापूर्वी भाऊ लौकिक दाभाडे यांना त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला असल्याचा खुलासा करण्यात आला होता. मयत डॉ मंदार दाभाडे यांचे अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरुन मंदार यांचा मोबाईल उघडला असता, त्यामध्ये एक धक्कादायक सुसाईड नोट आढळून आली.

पदाचा गैरवापर करत महिलेने मागितली 1 कोटीची खंडणी, अंबाजोगाईत गुन्हा दाखल

या नोटमध्ये मंदार यांनी ‘सॉरी पप्पा व भैया’ असे म्हणत आपल्या वडिलांची आणि भावाची माफी मागितली. स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. डॉ मंदार दाभाडे यांचे एका सहकाऱ्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत (मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. रोहिदास नगर, चनई रोड, अंबाजोगाई) ओळख होती. तिने मंदार यांना स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्स पाठवून शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त केलं होतं. त्यानंतर तिने ‘मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी विष पिऊन जीव देईन आणि सुसाईड नोटमध्ये तुझं नाव लिहीन’ अशी धमकी देत सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असल्याचं देखील त्या नोट मध्ये लिहिलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने डॉक्टर मंदार दाभाडे खचून गेले आणि त्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणाच्या अनुषंगाने समोर आलेल्या धक्कादायक खुलाशानंतर डॉ. मंदार दाभाडे यांचा भाऊ लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई येथील शहर पोलीस ठाण्यातीन पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ नुसार जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ससाणे करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version