विद्यार्थीनींच्या आरोग्यासाठी CBSE चं मोठं पाऊल! प्रत्येक शाळेत बनवणार मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर

CBSE Menstrual health center ने एक मोठं पाऊल उचललं आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर बनवण्याचे आदेश दिले आहेत.

CBSE Menstrual Health Center

CBSE’s big step! Menstrual health center to be set up in every school for girl students : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईने एक मोठं पाऊल उचललं आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर बनवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील. तसेच एक सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण तयार होईल. हा यामागील उद्देश आहे.

भारतात फक्त पदवीधरांची गर्दी; नोकरीबद्दल स्टेट ऑफ वर्किंग इंडियाच्या अहवालात धक्कादायक वास्तव

सर्वोच्च न्यायालयाने 20 जानेवारी 2026 ला दिलेल्या निर्णयांमध्ये म्हटलं होतं की, मासिक पाळीमध्ये महिलांना स्वच्छता आणि सुविधा मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार जर शाळांमध्ये या सुविधा नसतील तर त्याचा थेट परिणाम हा विद्यार्थिनींच्या अभ्यास आणि त्यांच्या आत्मविश्वासावर होतो. याच निर्णयावर अंमलबजावणी करत सीबीएसईने सर्व शाळांमध्ये मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर बनवण्याचे निर्देशित आहेत. जेणेकरून विद्यार्थिनींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.

कसं असणार हे मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटर?

सीबीएसईच्या शाळांमध्ये बनवण्यात येणाऱ्या या मेन्स्ट्रुअल हेल्थ सेंटरमध्ये विद्यार्थिनींसाठी अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन सहजासहजी मिळतील. जेणेकरून गरज पडल्यास विद्यार्थिनींना याचा वापर करता येईल. त्याचबरोबर स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाईल. वापरण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एक चांगली व्यवस्था असेल. काही शाळांमध्ये या सेंटरमध्ये एमएचएम कॉर्नर देखील विकसित केला जाईल. त्यामध्ये आरोग्याच्या संबंधित आवश्यक माहिती दिली जाईल.

पदाचा गैरवापर करत महिलेने मागितली 1 कोटीची खंडणी, अंबाजोगाईत गुन्हा दाखल

त्याचबरोबर या हेल्थ सेंटरमध्ये फक्त सुविधा दिल्या जाणार नाही. तर शाळांना या विषयावर विद्यार्थिनींना जागरूक करणं बंधन असेल. त्यासाठी वेळोवेळी हेल्थ सेशन आणि जेंडर सेन्सिटिव्ह चर्चा केली जाईल. या कार्यक्रमांचा उद्देश हा विद्यार्थिनींना हे सर्व विषय समजून सांगून त्याबाबत जागरूकता निर्माण करणे त्याचबरोबर मासिक पाळीला कोणताही निषिद्ध विषय न मानता त्याकडे आरोग्याच्या दृष्टीने बघणे गरजेचे आहे.

‘चैत्र चाहूल 2026’ – ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!

या सेंटर्ससाठी सीबीएसईने या सर्व शाळांसाठी एक रिपोर्टिंग सिस्टीम देखील तयार केली आहे. या सर्व शाळांना प्रत्येक महिन्याला तुमची या सेंटर्स बाबतीतील काय तयारी झाली आहे? तसेच कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत? या सर्वांची माहिती द्यावी लागेल. पहिला रिपोर्ट हा 31 मार्च 2026 पर्यंत आणि दुसरा रिपोर्ट 30 एप्रिल 2026 पर्यंत जमा करावा लागेल. हा रिपोर्ट केवळ अधिकृत गूगल फॉर्मच्या माध्यमातून स्वीकारला जाईल. जेणेकरून ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाईल.

भोंदूबाबा अशोक खरातची संपत्ती किती?…, आकडा ऐकून बसेल धक्का…

त्यामुळे सीबीएसईच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ज्यामध्ये शाळांमध्ये विद्यार्थींना मासिक पाळीच्या बाबतीत एक सुरक्षित वातावरण मिळेल. कोणत्याही भीती आणि लज्जेशिवाय त्या आपल्या आवश्यक गोष्टींबाबत बोलू शकतील. कारण समाजामध्ये हा विषय निषिद्ध मानला जातो. मात्र याबाबत विचार बदलण्याची गरज असल्याचे सीबीएसईच्या निर्णयाने समोर आले.

follow us