Download App

NIA ची मोठी कारवाई; दहशतवाद्यांच्या संपर्कातला मोहम्मद खानला उचललं…

NIA Raid : परदेशातील दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मोहम्मद जोहेब खान (Mohammad Joheb Khan) याला एनआयएच्या (NIA) पथकाने अटक केली आहे. एनआयएच्या पथकाकडून आज छत्रपती संभाजीनगरमधील 9 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत मोहम्मद खान याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

एनआयएच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमध्ये छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान, एनआयएच्या पथकाला इलेक्ट्रानिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान एनआयएच्या पथकाने मोहम्मद जोहेब खानला अटक केली असून त्याच्याविरोधात मुंबई एनआयएकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरच एनआयएने मोहम्मद जोहेब खानला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या साथीदारांचा तपास घेण्यात येत आहे.

Horoscope Today: आज ‘कुंभ’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

मोहम्मद खान याच्याकडून ISIS मध्ये सामिल होण्यासाठी त्यासोबतच हिंसक विचारांना प्रतिसाद देण्यास तरुणांना कट्टरपंथी बनवून ISISमध्ये सहभाग करुन घेण्यात येत होते. मोहम्मद खान हा भारतासह इतर देशातील जागतिक स्तरावरील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं एनआयएच्या तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे परदेशातील दहशतवाद्यांच्या मुख्य सुत्रदारांसोबत त्याचा संपर्क होता.

‘यूपी’त काँग्रेसला धक्का! लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपात प्रवेश

दरम्यान, मिळालेल्या माहितीनूसार एनआयएकडून महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील 9 ठिकाणी छापेमारी केली. अनेक संशय़ितांच्या घरांवर एनआयएने छापे टाकले. या छापेमारीत काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. ISIS या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या आणि दहशतवादी कारवाया करण्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगर येथून एका तरुणाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

follow us