‘यूपी’त काँग्रेसला धक्का! लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपात प्रवेश
Vibhakar Shastri Join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश घेतला. या मोठ्या धक्क्यातून सावरत असतानाच काँग्रेसला आणखी (Congress) एक धक्का बसला आहे. हा धक्का उत्तर प्रदेशात बसला आहे. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी (Vibhakar Shastri Join BJP) काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या उपस्थितीत विभाकर शास्त्री यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच मोठे नेते पक्ष सोडून जात असल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल
प्रवेशानंतर विभाकर शास्त्री यांनी ट्विट केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगू इच्छितो की मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच शास्त्री यांनी राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे उत्तर प्रदेशात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
Lucknow, Uttar Pradesh | Vibhakar Shastri, grandson of former PM Lal Bahadur Shastri, joins BJP in the presence of Uttar Pradesh Deputy CM Brajesh Pathak.
Shastri resigned from Congress today. pic.twitter.com/povEJbwkPy
— ANI (@ANI) February 14, 2024
शास्त्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या संकल्पनेला आणखी बळ देऊन देशाची सेवा करू शकेल. माझ्यासाठी भाजपाने दरवाजे उघडल याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. आजमितीस इंडिया आघाडीची कोणतीही विचारधारा नाही. पीएम मोदींना हटवणे एवढे एकच उद्दीष्ट त्यांच्यासमोर आहे. काँग्रेसची विचारधारा नेमकी काय आहे हे राहुल गांधींनी सांगायला हवे असे विभाकर शास्त्री म्हणाले.