Laxman Hake On Manoj Jarange : अरे तुझं वजनच 35 किलो आणि म्हणतोयं घरात घुसून मारीन, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची गाडी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर सटकलीयं. दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडमध्ये ओबीसी समाजबांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेतून लक्ष्मण हाकेंनी राज्यातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल चढवलायं.
रामगिरी महाराजांचं आता अती झालं; त्यांना एकदा.. राष्ट्रगीतावरील वक्तव्याने जितेंद्र आव्हाड संतापले
हाके पुढे बोलताना म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण या दोन्ही घटना महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणाऱ्या आहेत. गुन्हेगारांची जात शोधण्याचा बीडच्या नेत्यांकडून प्रयत्न होतोयं, याचा आम्ही ओबीसी बांधव निषेध करतोयं, गुन्ह्याचं आम्ही कधीही समर्थन केलेलं नाही, अशी वेळ कोणावरही येऊ नये असं म्हणणारी आम्ही माणसं आहोत पण काही नेते निवडून आले आणि एक आरक्षणाच्या आंदोलनाने नेता झालायं. तो म्हणाला की घरात घुसून मारीन, अरे तुझं वजनच 35 किलो आहे आणि घुसून मारण्याची भाषा करतोयं. तू चन्ना टन्ना म्हणून नेता झालायं, कडे-कडेसे जायेंगे म्हणणारा तू तुझ्याकडे काय तोफगोळे आहेत काय? असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केलायं.
मोठी घडामोड! ब्रिक्समध्ये इंडोनेशियाची एन्ट्री, पाकिस्तान अस्वस्थ; चीनचाही प्लॅन फेल
तसेच राजकारणावर बोलण्याचं कारण म्हणजे या गंभीर घटनेचं राजकारण दोन माणसांनी केलंय. एक म्हणजे मनोज जरांगे आणि दुसरा म्हणजे भाजपचा आमदार सुरेश धस. मनोज जरांगेचा कुठलाही अभ्यास नाही. तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला, कडे कडेसे जायेंगे काल म्हणाला घरात घुसून मारीन, त्यांच्याकडे काय तोफगोळे आहेत काय , त्याच वजन 35 किलो अन् म्हणतोयं घुसून मारीन, त्याची जागा आता घेतलीयं सुरेश धस यांनी घेतलीयं असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय.
महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली; कार्यकर्त्यांचं ठाकरेंसमोर खळ्ळखट्याक
आमदार सुरेश धसांकडून हत्येचं राजकारण
संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण आष्टी पाटोद्याच्या आमदाराने सुरु केलं. या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती, निकालानंतर याची भाषा बदलली. गुलाल अंगावर पडला अन् विजयी झालेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करतो. धनंजय मुंडे निवडून येऊ नये, मंत्री होऊ नये, पालकमंत्री होऊ नये म्हणून त्यांनी प्लॅन केला. सुरेश धश म्हणतोयं गॅंग्स ऑफ बीड, गॅंग्स ऑफ वासेपूर, अरे धस तुम्ही आमदार झाला तुम्ही ज्यावेळी आंतरवली सराटीत गोळीबार झाला, पोलिस भगीनींवर विनयभंग झाला बीडमध्ये ओबीसींची घरे जाळली, त्यावेळी बीडचा गॅंग्स ऑफ बीड धसला दिसले नाही का? असा थेट सवाल हाके यांनी केलायं.