Download App

“..तर त्यांचे आमदार चून चून के गिराएंगे”; ओबीसी नेत्याने कुणाला दिला इशारा ?

जो कुणी ओबीसी आरक्षणाला विरोध करील त्यांचे आमदार आम्ही चून चून के पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. 

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी (OBC Reservation) आंतरवाली सराटी जवळील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने इशाराही दिला. जो कुणी ओबीसी आरक्षणाला विरोध करील त्यांचे आमदार आम्ही चून चून के पाडू, असा इशारा शेंडगे यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात (Lok Sabha Election) मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा जोर धरू (Maratha Reservation) लागला आहे. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केले होते. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जवळील वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रकाश शेंडगे यांनी उपोषण स्थळी येत हाके यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

Manoj Jarange यांचे उपोषण अखेर स्थगित! सरकारला महिन्याभराच्या अल्टिमेटमसह राजकारणात उतरण्याचा इशारा

शेंडगे पुढे म्हणाले, ओबीसी उपोषणाचा वणवा राज्यभर पेटेल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशारा शेंडगेंनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणावर हल्ला झाला. याचा निषेध म्हणून आम्ही हे उपोषण सुरू केलं आहे. कुणबी दाखले देण्याचं काम सरकारनं बंद कराव. सगेसोयऱ्यांची अधिसूचना मागे घेतली पाहिजे अन्यथा या उपोषणाचा वणवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही असे शेंडगे म्हणाले.

यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. 80 टक्के मराठ्यांनी ओबीसीत घुसवण्याचं काम जरांगेंनी केलंय. यावर सरकारने मात्र अजून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. जर ओबीसी आरक्षण प्रभावित होत असेल तर सरकारने यावर माफी मागितलीच पाहिजे. एकट्या बीड जिल्ह्यातीलच 80 हजार कुटुंबांना प्रमाणपत्र दिले गेल्याचं शेंडगे यावेळी म्हणाले.

सरकारला आमची विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागला हे सांगावं नाहीतर उपोषणाचा वणवा राज्यभर पेटेल. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वच म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि तिकडे जरांगे म्हणतात 80 टक्के मराठे ओबीसीत घुसवले याकडे शेंडगेंनी लक्ष वेधले.

Manoj Jarange चा संघर्षयोद्धा चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात; जरांगेंनीही दिला इशारा

 

follow us

वेब स्टोरीज