Download App

तुमची एसीबी चौकशी लावेन, ओमराजे निंबाळकरांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

Omraje Nimbalkar : लातूर तालुक्यातील औसा येथे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी जनता दरबार घेतला होता. यावेळी अधिकाऱ्यांसोबत त्यांची चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी ते म्हणाले की माझ्या कामाचा अनुभव त्या अधिकाऱ्यांना नसणार, त्यामुळे त्यांच्याकडून गैरवर्तन झालं असेल पण त्यांनाही मी समज दिली आहे. आपण जर चौकटीच्या बाहेर जाऊन सामान्य माणसांना त्रास देत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा ओमराजे निंबाळकर यांनी दिला.

माझ्या हाताखाली ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम केले आहे त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. चांगले काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर थाप मारायला आम्ही कधी कमीपणा समजत नाही. जर चुकत असेल तर त्या नाठळाच्या माथी काठी कशी हाणायची हे देखील आम्हाला माहिती आहे, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Letsupp Special : शरद पवारांचा ‘अशोक बापूंवर’ विश्वास; अजितदादांना होमपीचवर रोखण्याची जबाबदारी

मी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार झाल्यापासून प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे काम सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मतदारांची देखील माझ्याकडून हीच अपेक्षा आहे. त्या अपेक्षांची पूर्तता व्हावी यासाठी माझा मोबाईल नंबर सर्व प्रशासकीय ऑफीसच्या बाहेर लावला आहे. कोणतेही प्रशासकीय काम कुठल्याही माणसाचे अडत असेल तर तो माणूस मला फोन करुन त्याच्या कामाची सोडवणूक करुन घेऊ शकतो, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने बच्चू कडू आक्रमक, ‘सरकारने नालायकपणा करु नये’

ते पुढं म्हणाले की ज्या तालुक्यातून जास्त तक्रारी येत आहेत. ज्या भागातील लोकांचे काम अडत आहेत, असे जर निदर्शनास आले तर अशा प्रकारचे जनता दरबार घेत असतो. यातून सामान्या माणसांच्या तक्रारी सोडवण्याची मदत होते. एका अधिकाऱ्याची तक्रार होती. सगळेच अधिकारी वाईट नसतात. जसे काही पुढारी वाईट असतात, काही चांगले असतात. तसं अधिकाऱ्यांचे देखील असतं, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

Tags

follow us