Greetings to Annabhau from SFI : जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर, समाजसुधारक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने सिटू भवन, अजब नगर, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ विचारवंत के.ई. हरीदास यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
महाराष्ट्राच्या राजकारणाला अन् प्रशासनाला हादरवणारी बातमी; अनेक मंत्री, अधिकारी हनी ट्रॅपमध्ये
के.ई.हरिदास यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर व साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकणारे विचार मांडले. एसएफआय चे अरुण मते यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक लढ्याचे महत्त्व व प्रेरणा यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन एसएफआयच्या जिल्हा समितीने केले होते.
या वेळी उपस्थितांनी सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणासाठी संघर्ष या मूल्यांना आपल्या जीवनात रूजवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे संचालन आशितोष ठोंबरे यांनी केले. कॉम्रेड मनिषा बल्लाळ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात पुढे यावे, असं आवाहन या कार्यक्रमात केले. या प्रसंगी सुरज देवकर, शितल चोपडे, विजय उमाळे, सलमान खान, आशा पारकर, नम्रता जवरे व विद्यार्थी उपस्थित होते.
अण्णाभाऊ कोण होते?
लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन १ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. हिंदूधर्मातील विषमतेमुळे जातीव्यवस्थेचे चटके बसल्याने,अस्पृश्यतेच्या जाचामुळे बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली. मुंबईतील गिरणीत बाल कामगार म्हणून काम करताना माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये राहातानाच १९३४-३५ साली तेथे राहणाऱ्या दलित आणि शोषित कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते कॉ.आर.बी.मोरे, कॉ. के.एम.साळवी, कॉ. शंकर नारायण पगारे आदींशी त्यांची ओळख झाली.