तटकरे मैदानात उतरले! आठ जिल्ह्यांचा सखोल संवाद दौरा सुरू, मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढणार

तटकरे मैदानात उतरले! आठ जिल्ह्यांचा सखोल संवाद दौरा सुरू, मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढणार

Sunil Tatkare Marathwada Western Maharashtra Visit : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि पक्षाच्या आगामी दिशा व धोरणांवर संवाद साधण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे उद्यापासून, म्हणजे 18 जुलैपासून चार दिवसांच्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांत ‘निर्धार नवपर्वाचा’ या अभियानांतर्गत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी विशेष पदाधिकारी संवाद मेळावे आयोजित करण्यात (Upcoming Election) आले आहेत.

आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत खुद्द प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची संपूर्ण माहिती दिली. त्यांच्यासोबत आमदार शिवाजीराव गर्जे (पक्षाचे कोषाध्यक्ष), महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, (Maharashtra Politics) मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे हेही उपस्थित होते.

नाना पटोलेंनी विधानसभेत फोडला ‘हनी ट्रॅप’चा बॉम्ब! पेनड्राइव्हमध्ये धक्कादायक गोष्टी

आज पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11.30 ते 1 वाजेपर्यंत संत एकनाथ रंगमंदिर येथे छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दुपारी 3.30 वाजता पक्ष कार्यालयात जालना जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता महावीर भवन येथे हिंगोली जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, 12.30 वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, सायंकाळी 4 ते 5.30 वाजता अक्षदा मंगल कार्यालयात परभणी शहर व ग्रामीण कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, 6 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे.

नाना पटोलेंनी विधानसभेत फोडला ‘हनी ट्रॅप’चा बॉम्ब! पेनड्राइव्हमध्ये धक्कादायक गोष्टी

तर दिनांक 20 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, 12.30 वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दुपारी 3.30 ते 6 वाजता कस्तुराई मंगल कार्यालयात लातूर शहर व ग्रामीण कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद, 6.30 ते 7 वाजता प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद, दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, 12.30 वाजता पत्रकार परिषद, दुपारी 3 ते 5 वाजता हेरिटेज हॉल गांधीनगर येथे सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकारी बैठक, सायंकाळी 5 वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद पार पडणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube