Download App

उमेदवारी मिळाल्यानं वनवास संपला का? पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मनात हूरहूर, राजकारण हा…’

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : काल भाजपच्या  (BJP) लोकसभा उमेदवारांची (Lok Sabha Elections) दुसरी यादी जाहीर झाली. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. बीडमधून प्रीतम मुंडेंचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Nilesh Lanke : माझ्यामुळं अजितदादांना खाली पाहण्याची वेळ येणार, लंके नेमकं काय म्हणाले?

प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद बीडमध्ये नुकतीच झाली. या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रीतमताईंचे तिकीट रद्द झाल्याने काही संमिश्र भावना आहेत. तसंच पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडणार, असंही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मला लोकसभेचे तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून तशा चर्चा सुरू होत्या. मात्र, जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणातली उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी निश्तित नसते. त्यामुळं मला आत्मविश्वास नव्हता. आता मला उमेदवारी देण्यात आली आहे, याचा मला आनंद आहे. प्रीतम आणि माझं कॉम्बिनेशन चांगलं होतं. त्याचं तिकीट कापून मला तिकीटं मिळालं, त्यामुळं काहीशा संमिश्र भावना आहे. थोडं दु:ख आहे, त्यांनाही जोपर्यंत चांगलं पद मिळत नाही, तोपर्यंत ते दु:ख राहिलं, असं पंकजा म्हणाल्या.

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन 

पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे आणि मी रोज बोलत असते. आमचा संवाद झाला आहे. धनंजय ज्या पक्षाचे आहेत त्यांची आणि आमच्या पक्षाशी युती केली आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी चांगला प्रयत्न करतील. धनंजय मुंडेचा पक्ष सोबत असल्यानं अधिक मतं मिळतील, असंही त्या म्हणाल्या.

भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. मी ही जबाबदारी सन्मान समजते. मनात थोडी हूरहूर आहे. नोकरीच्या पहिल्या इंटरव्हूवला जातांना किंवा लग्नाच्या बोहल्यावर चढतांना जशी हूरहूर वाटते, तशीच भावना आज माझ्या मनात आहे.

राजकीय वनवास संपला का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारण हा खडतर प्रवास आहे. तो कायमच सुरू असते. पदावर असण्याने कमी खडतर प्रवास असतो, असं नाही. बीडची जनता काय करेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. माझा प्रवास कसा असेल याची मलाली उत्सुकता आहे. प्रीतम मुंडेंच्या लोकसभेच्या निवडणुकीत संघर्ष केला होता. मी उत्सुक आहे की, काय परिस्थिती निर्माण होईल. आधी दुसऱ्यांसाठी लढणं हा अऩुभव होता. आता स्वत:साठी उमेदवारी मिळाल्यावर अनुभव वेगळा असेल.

प्रीतम मुंडे काय म्हणाल्या?
ताई आमच्या नेत्या, नेत्यांना शिकण्याचे दिवस अजून आले नाहीत. त्यांच्या विजयासाठी जोराने तयारीला लागलो आहोत. ताईच्या पाठींशी मोठ्या ताकदीने उभं आहोत. ताईचं बोट धरून प्रत्येक पाऊल टाकलं आहे. त्या प्रगल्भ अभ्यास त्यांना मार्दर्शनाची गरज नाही, असं प्रीमत मुंडे म्हणाल्या.

follow us