Download App

आता मला आष्टीवर काकणभर जास्त प्रेम करावं लागेल; पंकजा मुंडेंचा सुरेश धसांना खोचक टोला

Pankja Munde यांनी सुरेश धस यांनी संतोष देखमुख हत्येप्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला. त्या आज बीडमध्ये बोलत होत्या.

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde on Suresh Dhas in Beed : पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांनी संतोष देखमुख हत्येप्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला. त्या आज बीडमध्ये गेल्या असताना महासांगवी, कवडवाडी ता.पाटोदा येथे श्री संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळा,अखंड हरिनाम सप्ताह,पंचकुंडी महायज्ञ,श्री भगवान शंकर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सर्वच मुद्द्यांना हात घालत टीकाकारांना उत्तर दिले.

पब्लिकला आपलंस करण्यासाठी गडावर जाणं अन् धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये; पंकजांचा रोख कुणाकडे?

मुंडे म्हणाल्या की, बीडमध्ये आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल मला. कारण परळी राष्ट्रवादीची झाली. पण आष्टी हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे काकणभर जास्त प्रेम करावं लागेल. सारखं इथे यावं लागेलं. तसेच लोक सांगतील तोपर्यंत काम करेन पण जेव्हा लोक घरी बसा म्हणतील तेव्हा मी घरच्या गादीवर बसेन असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांनी संतोष देखमुख हत्येप्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधत खोचक टोला लगावला.

क्षमाशील सरकार, खुन्यांना मोकळं सोडा; जितेंद्र आव्हाडांचा नेमका कोणावर निशाणा?

तसेच यावेळी मुंडे यांनी कोणत्याही गडावर लोक का जातात माहित नाही? तेथे लोकांची श्रद्धा जास्त आहे. तेथे लोकांचा पाठिंबा मिळतो. म्हणून की काय? पण माझं उलट आहे. मी लोकांना आपलसं करायला नाही तर लोक आपले आहेत म्हणून गडावर जाते. तसेच राजकारण आणि धर्मकारणात एक नात हवं. पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे. त्यामुळे राजकारण्यांनी धर्मात लक्ष घालू नये. तसेच धर्माच्या व्यक्तीने विरक्ती घेतल्या शिवाय तो धर्माचं काम करू शकत नाही. असं म्हणत त्यांनी धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये. असा सल्ला देखील यावेळी मुंडेंनी दिला.

जिहादींच्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करा; आ. संग्राम जगतापांचा मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या

त्यांच्या विधानानंतर पंकजांचा रोख नेमका कुणाकडे होता? अशा चर्चांना उधान आले आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच संतोष देखमुख हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेले तसेच राजीनामा मागितलेले मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर मंहंत नामदेव शास्त्री महाराज यांना भेटायला गेले हेतो. त्यानंतर महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेत त्यांची पाठराखण केली होती. त्यामुळे पंकजा मुंडेंनी बीडमध्ये बोलत असताना पब्लिकला आपलस करण्यासाठी गडावर जाऊ नका आणि धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये. असं म्हणत एक प्रकारे धनंजय मुंडेंचे कान टोचले आहेत.

follow us