पब्लिकला आपलंसं करण्यासाठी गडावर जाणं अन् धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये; पंकजांचा रोख कुणाकडे?

पब्लिकला आपलंसं करण्यासाठी गडावर जाणं अन् धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये; पंकजांचा रोख कुणाकडे?

Pankja Munde on Dhananjay Munde and Namdev shatri in Beed : पंकजा मुंडे यांनी पब्लिकला आपलस करण्यासाठी गडावर जाऊ नका आणि धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये असं विधान केलं आहे. त्या आज बीडमध्ये गेल्या असताना महासांगवी, कवडवाडी ता.पाटोदा येथे श्री संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळा,अखंड हरिनाम सप्ताह,पंचकुंडी महायज्ञ,श्री भगवान शंकर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सर्वच मुद्द्यांना हात घालत टीकाकारांना उत्तर दिले.

क्षमाशील सरकार, खुन्यांना मोकळं सोडा; जितेंद्र आव्हाडांचा नेमका कोणावर निशाणा?

मुंडे म्हणाल्या की, कोणत्याही गडावर लोक का जातात माहित नाही? तेथे लोकांची श्रद्धा जास्त आहे. तेथे लोकांचा पाठिंबा मिळतो. म्हणून की काय? पण माझं उलट आहे. मी लोकांना आपलसं करायला नाही तर लोक आपले आहेत म्हणून गडावर जाते. तसेच राजकारण आणि धर्मकारणात एक नात हवं. पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे. त्यामुळे राजकारण्यांनी धर्मात लक्ष घालू नये. तसेच धर्माच्या व्यक्तीने विरक्ती घेतल्या शिवाय तो धर्माचं काम करू शकत नाही. असं म्हणत त्यांनी धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये. असा सल्ला देखील यावेळी मुंडेंनी दिला.

जिहादींच्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करा; आ. संग्राम जगतापांचा मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या

त्यांच्या विधानानंतर पंकजांचा रोख नेमका कुणाकडे होता? अशा चर्चांना उधान आले आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच संतोष देखमुख हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेले तसेच राजीनामा मागितलेले मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर मंहंत नामदेव शास्त्री महाराज यांना भेटायला गेले हेतो. त्यानंतर महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेत त्यांची पाठराखण केली होती. त्यामुळे पंकजा मुंडेंनी बीडमध्ये बोलत असताना पब्लिकला आपलस करण्यासाठी गडावर जाऊ नका आणि धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये. असं म्हणत एक प्रकारे धनंजय मुंडेंचे कान टोचले आहेत.

पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या की, मुलीच्या जन्माचं स्वागत करा. कारण मला लोकांनी गोपीनाथ मुंडेंनंतरच स्थान दिलं जे सर्वात मोठं आहे. त्यामुळे मुलींना सन्मान द्या त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या पाठीशी उभे रहा मग त्या वंशाच्या दिवा बनल्या शिवाय राहणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube