Pankaja Munde यांनी पुरवला हट्ट, चिमुकल्यांनी केली आनंदात घोषणाबाजी

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे सोशल मिडीयावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात. यावेळी त्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. याठिकाणी काही लहान मुलींनी त्यांच्या गाडीत बसण्याचा हट्ट केला. लागलीच पंकजा मुंडे यांनी या लहान मुलींना आपल्या गाडीत बसवले आणि कार्यक्रम स्थळी नेले. या मुलींचा हट्ट पंकजा मुंडे यांनी पुर्ण केल्यानंतर […]

WhatsApp Image 2023 03 04 At 2.37.00 PM

WhatsApp Image 2023 03 04 At 2.37.00 PM

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे सोशल मिडीयावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात. यावेळी त्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. याठिकाणी काही लहान मुलींनी त्यांच्या गाडीत बसण्याचा हट्ट केला. लागलीच पंकजा मुंडे यांनी या लहान मुलींना आपल्या गाडीत बसवले आणि कार्यक्रम स्थळी नेले.

या मुलींचा हट्ट पंकजा मुंडे यांनी पुर्ण केल्यानंतर गाडीत बसल्याचा आनंद या लहानग्या मुलींनी घेतला. तर त्यांनी पंकजा मुंडेंच्या नावाने घोषणाबाजी केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी दौऱ्यावरत्यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत कौठळी आणि कौठळी तांडा पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला.

Chandrashekhar Bawankule : शरद पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील, ते बघून घ्यावेत

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायॉरल झाला होता. तेव्हा त्यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावरून येताना पुणे-मुंबई रस्त्यावर त्यांनी एका कुंटुबाने गाडी थांबवण्यासाठी आग्रह केला असता गाडी थांबवून चिमुकलीला खेळवलं होत. तिने ही पंकजा मुंडेंकडून न जाण्याचा हट्ट केला आहे.

Exit mobile version