Pankaja Munde Vs Dhananjay Munde : देशभरात आज रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकीय बंधू महादेव जानकर यांना माहूरच्या रेणूका मंदिरात राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. धनंजय मुंडेंना राखी कधी बांधणार या प्रश्नावर पंकजा मुंडे की कोणी राखी बांधा म्हटले तर आपण नाकारु शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. दरम्यान मुंडे बहिण-भावातील दुरावा कमी झाल्याचे बोलले जात होते पण अजून संघर्ष असल्याचे दिसून येते.
पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रेची सुरुवात नांदेड जिल्ह्यातील माहूर गड देवीचे दर्शन घेऊन केली. यावेळी त्यांच्यासोबत रासप नेते महादेव जानकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्या म्हणाल्या की माझा भाऊ सोबत घेऊन मी आले आहे. ज्यांना ज्यांना मी दरवर्षी राखी बांधते. जे लोक मुंडे साहेब असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या प्रत्येक संघर्षात सोबत आहेत. ते भाऊ माझ्यासोबत माहूर गडावर आलेत.
8 हजार भगिनींनी राखी बांधताच आमदार बेनकेंनी दिला शब्द, ‘हा भाऊ तुमच्या…’
त्या पुढे म्हणाल्या, आज रेणुका मातेचे दर्शन घेतले. हे कुलदैवत आणि प्रेरणास्थान आहे, यातून ऊर्जा मिळते. श्रावण महिन्यांमध्ये शिवशक्ती परिक्रमा करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठे तसेच बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहे. याची सुरुवात आज रेणुका मातेच्या दर्शनाने केली आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडेंबद्दल प्रश्न विचारला असता मी आज दर्शनासाठी आले आहे. योग्य वेळी मी योग्य उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय संघर्ष कमी झाल्याचे बोलले जात होते. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील आनंदताचा डोह असो किंवा दु:खाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.
‘मातोश्री’ची खरी मम्मी उद्या महाराष्ट्रात येतेय; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
त्यानंतर परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या होत्या. त्यामध्ये पंकजा मुंडे अध्यक्षपदी तर धनंजय मुंडे गटाकडे उपाध्यक्षपदी निवड झाली होती.