‘मातोश्री’ची खरी मम्मी उद्या महाराष्ट्रात येतेय; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Nitesh Rane Uddhav Thackeray Sonia Gandhi

Nitesh Rane On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा नसते तर ठाकरे कुटुंबाने मुंबई विकून टाकली असती, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईला धोका हा पाटणकर, सरदेसाई यांच्याकडून धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या मुंबईत इंडियाच्या बैठकीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी येणार आहेत, त्यावरुन ‘मातोश्री’ची खरी मम्मी उद्या मुंबईमध्ये येणार असल्याची टीका यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. आज नितेश राणे यांनी शिधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

केंद्राचा वक्फ बोर्डाला दणका; 123 मालमत्ता परत घेणार, दिल्लीतील जामा मशिदीचाही समावेश

मुंबईमध्ये उद्या विरोधकाच्या इंडिया आघाडीची बैठक सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘इंडिया’आघाडीच्या बैठकीला? राजू शेट्टींनी दिलं उत्तर

यावेळी खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे लाचार, बोळचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. ते मोदी आणि शाहांच्या दावणीला आहेत असं म्हणाले, त्यावर नितेश राणे म्हणाले की, कोण लाचार होतं? कोण पुळचट होत? कोण खोटारडा होता? कोण घरकोंबडा होता? हे अडीच वर्षात महाराष्ट्राने पाहिले आहे.

खरं म्हटलं तर मातोश्रीची खरी मम्मी उद्या महाराष्ट्रात येत आहे. ज्यांच्यासमोर वाकून वाकून उद्धव ठाकरेंची मान वाकडी झाली, गळ्याला पट्टा बांधायला लागला. झुकण्याचा आणि वाकण्याचा ज्यांनी उच्चांक गाठला त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांना नावं ठेवू नये.

उद्या इंडिया बैठकीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी खालच्या पातळीवर जाऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांच्यासमोर वाकत, झुकत होते अशी टीकाही यापूर्वीही केली आहे.

इतिहासामध्ये सर्वाधिक कमजोर, सर्वात जास्त पुळचट आणि झुकणारा मुख्यमंत्री कोण असेल तर तो तुझा मालक उद्धव ठाकरे आहे, असा थेट टोला संजय राऊत यांना लगावला आहे.

Tags

follow us