Download App

पंकजा मुंडेंनी वेळ साधली! ‘शिवशक्ती’ नावामागे दडलंय ‘राजकीय कमबॅक’ चं गणित

  • Written By: Last Updated:

बीड : राजकारणातील सुरू असलेल्या कुरघोडींमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर आता त्यांचा राज्यव्यापी दौरा आखण्यात आला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा पंकजा मुंडे सक्रीय होणार असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्याची जशी चर्चा होत आहे तसेच याच्या नावाचीदेखील तेवढीच चर्चा होत आहे. पंकजांच्या या दौऱ्याला ‘शिवशक्ती’ असे नाव देण्यात आले आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे 10 हून अधिक जिह्यांमधील कार्यकर्त्यांच्या भेटी तसेच देवदर्शन घेणार आहेत. श्रावण महिना आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेचे दर्शन या दौऱ्यात पंकजांकडून घेतले जाणार असून, दुसरीकडे शिवशक्ती नावामागे पंकजा मुंडेंचे राजकीय कमबॅकचं गणित दडलं असल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील दोन ‘दादांचा’ वाद शिगेला; नाराजी नाट्यात CM शिंदेंची एन्ट्री

कसा असणार पंकजांचा शिवशक्ती दौरा?

दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडेंनी त्यांचा शिवशक्ती दौरा जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा केला जाणार असून, हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे सांगितले जात आहे. दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार असून पंकजा मुंडेंकडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात देवदर्शन केले जाणार आहे.

अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी

शिवशक्ती असे नाव का?

सध्या श्रावण मास सुरू असून, पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी काढण्यात येत आहे. त्याच बरोबर शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेचेही दर्शन या दौऱ्यात पंकजा मुंडे घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याला शिवशक्ती दौरा असे नाव देण्यात आले आहे. मध्यंतरीच्या नाराजी नाट्यानंर पंकजांचा हा पहिलाच राज्यव्यापी दौरा असून, देवदर्शनासोबतच पुढील काळात निवडणुकांमध्ये पुन्हा ताकदीने कमबॅक करण्याचा उद्देश या दौऱ्याच्या माध्यामातून साधला जाऊ शकतो. त्यामुळे दौऱ्याच्या नावातचं राजकीय कमबॅकचं गुपित दडलं असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

धनंजय मुंडेंना मंत्रिपद मात्र पंकजांना प्रतीक्षा कायम 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांनी पक्षासोबत बंड करून भाजपसोबत हात मिळवणी केली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सत्तेत सहभागी झाले. यातील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे पारंपारीक प्रतिस्पर्धी असणारे त्याचे चुलत बंधू धनंजय मुंडेंचा देखील सहभाग आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना सातत्याने डावलेले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. या आणि इतर कारणांमुळे पंकजा भाजपमध्ये नाराज असल्याचे दिसून येत आहे.

‘अजितदादा सोबत आले अन् माझं खातं… महाजनांनी सांगितलं खातेवाटपाचं सत्य

मध्यंतरी पंकजा  मुंडेंनी पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली होती. तसेच याबाबत पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांची वैयक्तिक मते आहेत. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यासोबत आल्याने आमच्यातील ज्या लोकांचा राष्ट्रवादीशी संघर्ष राहिलेला आहे ते नाराज असणे बरोबर आहे. परंतु ते सर्व एका दिवसात स्वीकारू शकत नाहीत. हे सर्व स्वीकारण्यासारखा त्यांना वेळ लागेल. पक्षाचे वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांच्याशी बोलतील आणि मला विश्वास आहे की, त्या आमच्या पक्षासोबत काम करतील.

Tags

follow us