पुण्यातील दोन ‘दादांचा’ वाद शिगेला; नाराजी नाट्यात CM शिंदेंची एन्ट्री
पुणे : शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासकीय बैठकींचा धडाका लावला आहे. त्यात अजितदादांना पुण्याचे पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा आहे. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये अजित पवारांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. पार पडलेल्या या बैठकांना पुण्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. परंतु, आता दोन्ही दादांमध्ये कोल्ड वॉर सुरू असून, या वादात आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) एन्ट्री झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार दिलेल्या बोलले जात आहे.
बावनकुळेंचं प्रेम पुतना मावशीचं; शरद पवारांवरील टीकेवर देशमुखांचं प्रत्युत्तर
तीन महिने झाले तरी अर्थखात्याकडून परवानगी नाही
दुसरीकडे पुण्यामध्ये मे महिन्यात शरद पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. यात सुमारे 400 कोटींच्या विकास कामांना मजुंरी देण्यात आली होती. परंतु, तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही अद्यापपर्यंत या निधीली मंजुरी देण्यात आलेली नाही. ही मंजुरी अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी पार पडली होती. मात्र, याला अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्याकडून मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज चंद्रकांत पाटलांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली आहे.
सर्वजण खेळीमेळीने काम करत आहोत – अजित पवार
एकीकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये कोल्डवॉर सुरू असल्याच्या चर्चांनी डोकेवर काढलेले असतानाच काल (दि.28) अजितदादांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी, आम्ही सगळे खेळीमेळीने काम करत आहोत, राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत. चंद्रकांत पाटील यांना मुद्दाम बोलवत नाही असं नाही. आम्ही निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता बैठका घेत आहोत, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपर पालकमंत्रीपदाच्या चर्चांवर सेफ उत्तर दिले.
उद्धव ठाकरेंना नात्यांचे महत्त्व कळत नाही; ठाकरेंच्या टीकेवर भावना गवळींचं प्रत्युत्तर
नेमकं कुणाचं ऐकायचं?
दुसरीकडे चंद्रकांतदादा पुण्याचे विद्यामान पालकमंत्री असल्याचे ते वेळोवेळी शहरातील विविध प्रश्नांसंबंधी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत असतात. तर, आपण मंत्री असल्याने आपल्याला बैठका घेण्याचा अधिकार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. दोन्ही मंत्री अधिकाऱ्यांना कामांबाबत सूचना देत असल्याने नेमकं ऐकायचं कुणाचं असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
सुपर पालकमंत्रीपदावर काय म्हणाले अजितदादा
अजित पवार यांनी मागील दोन महिन्यांपासून पुण्यात प्रशासकीय बैठकांचा धडाका सुरु केला आहे. यामुळे ते सुपर पालकमंत्री आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. याच प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, तुम्ही काहीही अंदाज लावू नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी, आम्ही सगळे खेळीमेळीने काम करत आहोत, राज्याच्या विकासासाठी काम करत आहोत.
‘अजितदादा सोबत आले अन् माझं खातं… महाजनांनी सांगितलं खातेवाटपाचं सत्य
अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यात प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक होत असे. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नियमित बैठका घेत नसल्याचे दिसून येते. याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, मी जर आयुक्तांची बैठक घेतली, तर मला असं वाटतं की मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम सातच दिवस राहणार आहे. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात लगेच बैठक घेतो.
पुण्यात अजितदादांचा धडाका :
पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, रखडलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्न याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर बैठकांचा धडका सुरु केला असून ते चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे.