धक्कादायक! बीडमध्ये भीषण अपघात, भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट

पेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन जाणारे हे टँकर कोळवाडीजवळ आल्यानंतर अज्ञात कारणांमुळे पेटले. भररस्त्यावर धावत्या टँकरने आग घेतली.

News Photo   2025 12 12T194719.280

धक्कादायक! बीडमध्ये भीषण अपघात, भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट

बीडच्या पालीजवळ असलेल्या कोळवाडी गावाजवळ (Beed) आज शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी ५.१५ च्या सुमारास डिझेलच्या टँकरने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे. भर रस्त्यावर वेगात असलेल्या या टँकरने आग घेतल्यामुळे परिसर हादरला आणि स्फोटाच्या भीतीने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती.

पेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन जाणारे हे टँकर कोळवाडीजवळ आल्यानंतर अज्ञात कारणांमुळे पेटले. भररस्त्यावर धावत्या टँकरने आग घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली. टँकरमध्ये डिझेलचा मोठा साठा असल्याने आग प्रचंड वेगाने वाढली. डिझेलमुळे टँकर अक्षरशः जळून खाक झाला आणि परिसरात स्फोट होण्याची भीती होती. या भीषण आगीमुळे रस्त्यालगतची झाडेही पेटली, ज्यामुळे परिसरात धुराचे आणि आगीचे मोठे लोट पसरले होते.

धक्कादायक! बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनमध्ये घोटाळा, किती कोटींचा आहे घोळ?

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केलं. या भीषण आगीत काही जीवितहानी झाली आहे का, याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही.

Exit mobile version