Beed-Pune Railway : पुणे आणि बीडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे आणि बीडमधील रेल्वे प्रवाशांना गणेशोत्सवात सरकारकडून गिफ्ट मिळाले आहे. पुणे ते बीड नवीन रेल्वे (Pune-Beed Railway) धावणार असून यामुळे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा येत्या 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
रेल्वे सेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
-गाडी क्रमांक 11433 / 11434 पुणे -बीड-पुणे एक्सप्रेस (दैनंदिन)
-गाडी क्रमांक 11433 पुणे-बीड एक्सप्रेस (दैनंदिन) ची नियमित सेवा 22.09.2026 मंगळवारपासून
-11433 पुणे-बीड एक्सप्रेस दररोज पुणे येथून 22:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06:00 वाजता बीड येथे पोहोचेल.
-गाडी क्रमांक 11434 बीड-पुणे एक्सप्रेस (दैनंदिन) ची नियमित सेवा 23.09.2026 (बुधवार) पासून सुरू होईल. ही गाडी दररोज बीड येथून 21:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05:20 वाजता पुणे येथे पोहोचेल.
-अंतर आणि प्रवासाचा कालावधी: ही गाडी एकूण 326 किलोमीटरचे अंतर कापेल. पुणे ते बीड प्रवासाचा कालावधी 07 तास 15 मिनिटे, तर बीड ते पुणे परतीच्या प्रवासाचा कालावधी 07 तास 50 मिनिटे असेल.
-डब्यांची संरचना: ही गाडी आधुनिक 15 एलएचबी डब्यांच्या संरचनेसह चालविण्यात येईल. यामध्ये 01 एसी 2-टियर (LWACCW), 02 एसी 3-टियर (LWACCN), 06 स्लीपर क्लास (LWSCN), 04 जनरल सेकंड क्लास (LWS), 01 सेकंड क्लास लगेज/ब्रेक व्हॅन (LSLRD) आणि 01 जनरेटर कार (LWLRRM) यांचा समावेश आहे.
रेल्वे कुठे-कुठे थांबणार?
थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोह, न्यू आष्टी आणि अमळनेर भंड्याचे.
आरक्षण आणि तिकीट बुकिंगची माहिती…
नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या नियमित गाडी क्रमांक 11433 आणि 11434 चे आरक्षण 20.09.2026 पासून सर्व संगणकीकृत पीआरएस तिकीट केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर (www.irctc.co.in) सुरू होणार आहे.
नवीन दैनंदिन सेवा सुरु करण्यात आल्याने परिचलनाच्या दृष्टीने खालील बदल…
-गाडी क्रमांक 11405 पुणे-अमरावती एक्सप्रेस: 25.09.2026 पासून ही गाडी पुणे येथून 22:55 वाजता सुटेल. यापूर्वी तिची पुणे येथून सुटण्याची वेळ 22:45 वाजता होती. दौंड येथे ही गाडी 00:28/00:30 वाजता थांबेल. यापूर्वी दौंड येथील थांब्याची वेळ 00:10/00:12 वाजता होती. इतर स्थानकांच्या विद्यमान वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
-गाडी क्रमांक 11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस: 22.09.2026 पासून ही गाडी पुणे येथून 23:05 वाजता सुटेल. यापूर्वी तिची पुणे येथून सुटण्याची वेळ 23:00 वाजता होती. दौंड येथे ही गाडी 01:25/01:30 वाजता थांबेल. यापूर्वी दौंड येथील थांब्याची वेळ 00:55/01:00 वाजता होती. इतर स्थानकांच्या विद्यमान वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
-गाडी क्रमांक 16381 पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस: 22.09.2026 पासून ही गाडी सुधारित वेळापत्रकानुसार धावेल. ही गाडी पुणे येथून पूर्वीच्या 23:45 वाजताच्या वेळेऐवजी सुधारित वेळेनुसार 23:20 वाजता सुटेल. ही गाडी दौंड येथे 00:20/00:25 वाजता, कुर्डुवाडी येथे 02:03/02:05 वाजता आणि सोलापूर येथे 03:20/03:25 वाजता थांबेल.
-प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी मार्गावरील सर्व स्थानकांवरील गाडीच्या अचूक आगमन व प्रस्थानाच्या वेळांची माहिती भारतीय रेल्वेच्या चौकशी पोर्टल www.enquiry.indianrail.gov.in वर किंवा अधिकृत NTES ॲप डाउनलोड करून तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
