बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना अटक केली आहे. शनिवारी (25 नोव्हेंबर) दुपारी चिखली रोडवरील राहत्या घरातून बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली. सोयाबिन आणि कापसाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुपकर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Ravikant Tupkar, leader of Swabhimani Farmers Association, has been arrested.)
मागील काही दिवसांपासून रविकांत तुपकर सोयाबिन आणि कापसाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहे. खान्देश, मराठवाडा, विदर्भातून त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. 20 नोव्हेंबरला त्यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात एल्गार आंदोलन झाले होते. त्यात त्यांनी 28 नोव्हेंबरला मुंबईत धडक देऊन 29 नोव्हेंबरला मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुपकर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.